छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा

10 हजार 898 घरकूल मंजूर, लाभार्थ्यांना मिळणार पहिला हप्ता | सुमारे 131 कोटी मिळणार टप्या-टप्याने

२०१८-२०१९ या वर्षात ग्रामपंचायत स्थरावर आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबाचा सर्व्हे करून २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात १० हजार ८९८ लाभार्थीना घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना १६५१ तर इतर सर्वांना ९२४८ एवढी घरकुल मंजूर करण्यात आली आहेत.

१३० कोटी ७७ लाख रुपये

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व प्रवर्गातील कुटुंबांना २०२४-२०२५ पहिल्यांदाच १० हजार ८९८ लाभार्थांना घरकुल मंजूर झाले आहेत. यासाठी एकूण १३० कोटी ७७ लाख रुपये एवढी रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहे.

२०२४-२०२५ या आर्थिक वर्षात १० हजार ८९८ लाभार्थीना घरकुल मंजूर

२०१८-२०१९ या वर्षात ग्रामपंचायत स्थरावर आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबाचा सर्व्हे करून २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात १० हजार ८९८ लाभार्थीना घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना १६५१ तर इतर सर्वांना ९२४८ एवढी घरकुल मंजूर करण्यात आली आहेत.

या लाभार्थीच्या खात्यावर पहिला हप्ता (टप्पा) टाकण्यास पंचायत समितीतील घरकुल विभागाने सुरुवात केली असून तांत्रिक अडचणीमुळे रखडलेल्या लाभार्थीचे बँक खाते दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची गरज

ग्रामपंचायत आधिकारी तालुक्याच्या ठिकाणी बसून कारभार हकतात

पंचायत समितीमध्ये घरकुल विभागाचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी तालुक्यातील काही ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत आधिकारी तालुक्याच्या ठिकाणी बसून कारभार हकतात अशा तक्रारी आहेत. घरकुलांच्या याद्यांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची मदत आवश्यक आहे.

त्यांची मदत तात्काळ मिळत नसल्याने शुक्रवार दुपारी पंचायत समिती सभागृहात ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांची चांगलीच धांदल उडाली. तशी चर्चा पंचायत समिती विभागात दिवसभर होती.या दहा हजार लाभार्थीच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यासाठी १६ कोटी ३४ लाख ७० हजार एवढी रक्कम जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व लाभार्थीच्या खात्यात..

एकूण १३० कोटी ७७ लाख रुपये एवढी रक्कम टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा होणार

तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थीच्या खात्यात पहिला हप्ता (टप्पा) जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हप्ता मिळाल्यानंतर तात्काळ कामास सुरुवात करावी, जेणेकरून पुढील हप्ता लवकर मिळणे शक्य होईल आणि घरकुलाचे स्वप्न वेगाने पूर्ण होईल.

-डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, गटविकास अधिकारी

एकूण १३० कोटी ७७ लाख रुपये एवढी रक्कम टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.