समाज प्रबोधनकार संगिताताई अण्णासाहेब पवार(महाराज )यांची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना मध्यराञीच्या सुमारास घडली आहे.
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचडगांव येथील समाज प्रबोधनकार कीर्तनकार असलेल्या संगिताताई महाराज यांची ‘मोहटादेवी आश्रमात’ डोक्यात दगड घालून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे.

हत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही.
मध्यराञीच्या सुमारास ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनास्थळी पोलिस यंञणा दाखल झाली असून,श्वानपथकासह तपास कार्य सुरू आहे.
वैजापूर-गंगापूर महामार्गावरील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात राहणाऱ्या ह.भ.प. संगीता ताई पवार (वय 50) यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Vaijapur murder) ही घटना शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Chinchadgaon ashram killing)
संगीता ताई पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात (Sadguru Narayangiri Kanya Ashram) वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत. दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत, परंतु बुधवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. (Female kirtankar murder)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीता ताई पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली.
दरम्यान या हत्येमागे नक्कीच काहीतरी मोठ कारण असल्याच बोललं जात आहे.