जून महिना जुन्या वादांचा दी एंड करणारा महीना ठरला. तीन आठवडे तीन खून अशी ही मालीका. तालुक्यात तीन घटना हादरून टाकणाऱ्या घडल्या. एका तरुणासह महिलेच्या खुनानंतर आता समाज प्रबोधन करणाऱ्या महीला कीर्तनकाराचीही डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.
या घटनांमुळे तालुक्यातील वातावरण ढवळून तर निघालेच. परंतु या पाठोपाठ घडलेल्या घटनांनी समाजमन सुन्न झाले. या घटनांमुळे तालुक्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
पहिली घटना
पूर्व वैमनस्यातून तालुक्यातील खंडाळा येथे १२ रोजी जून दोन गटांत ‘राडा’ होऊन मोईन शहा या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात आगडोंब उसळला अन् पोलिसांसह अख्खं गाव वेठीला धरले गेले. घटना झाली ते नक्कीच वाईट आहे.

शेवटी हत्येची घटना समर्थनीय होऊच शकत नाही. काही झालं तरी कायदा हा श्रेष्ठ असतो अन् त्याचे पालन झालेच पाहिजे. परंतु प्रतिउत्तरा दाखल गावातील दुकानांच्या तोडफोडीसह जाळपोळ ही कितपत समर्थनीय आहे. या घटनेतील सात जणांना पोलिसांनी गजाआड केले तसे जाळपोळ करणाऱ्या ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्या दोन गटांत राडा झाला.
त्यात सर्व तरुण वर्ग आहे. पंचवीशीतील तरुणाईची छोट्यामोठ्या कारवाणावरून चाकूने भोसकण्यापर्यंत मजल जाते. याचाच अर्थ राग, व्देष, मत्सर, असूया किती पराकोटीपर्यंत जाऊन पोहोचली. यावर मंथन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोलिसांनी त्यांचे काम केले. गुन्हाही दाखल झाला. परंतु प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचतील अन् अशा घटनांना आवर घालतील. सर्व जबाबदारी पोलिसांवर ढकलून चालणार नाही. हा गैरसमज दूर करावा लागणार आहे. गाव असो शहर.

सामाजिक सलोखा ठेवण्याचे काम अगोदर नागरिकांचे आहे. समाज माध्यमातून सामाजिक सलोखा, बांधिलकीच्या ‘गप्पा’ झोडणारे वेळ आली की, ते किती संकुचित असतात? याची प्रचीती यापूर्वीही वारंवार आलेली आहे. समाज माध्यमांवर मोठं तत्वज्ञान अथवा उपदेशाचे ‘डोस’ पाजळले म्हणजे आपली जबाबदारी संपली किंवा आपण फार मोठे समाजसेवक आहोत.
असा पायंडा काही दिवसांपासून तालुक्यात सुरू झाला. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा असे ‘ऑनलाईन समाजसेवक’ शेपूट घालून विजनवासात जातात. त्यामुळे अशा घटनांना आळा बसणार नसेल तर हा नंगानाच वाढत जाईल अन् दोन समाजात, समुदायात सामाजिक दरी वाढत जाईल.
दुसऱ्या एका घटनेत
तालुक्यातील राहेगावात अंगणवाडी सेविका असलेल्या अनिता शेलारचा (५५) पोस्टमन पती चांगदेव शेलारने बळी घेतला. ही घटना १४ जूनच्या रात्री घडली. आयुष्याच्या उत्तरार्धात नातवांसोबत खेळण्या-बागडण्याच्या वयात चांगदेवने पत्नीचा रक्तरंजित शेवट केला. कोयत्याने सपासप वार करून पत्नीला संपवून तो जेलमध्ये ‘सरकारी पाहुणा’ झाला.

एकीकडे तरुणाई भरटकत चालल्याचा ठपका ठेवणाऱ्यांना ही सणसणीत चपराक म्हणावी लागेल. आयुष्याच्या उत्तरार्धात नातवापंतांचे धनी झालेली माणसं जर असा रक्तरंजित शेवट करत असतील तर मानसिकता कुठं चाललीय?
तिसरी घटना मन हेलावून टाकणारीच
महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
वैजापूर, गंगापूर रोडवर मोहटादेवी आश्रमातील घटना
वैजापूर पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर रोडवर असणाऱ्या मोहटादेवी आश्रमात रा हणाऱ्या महिला कीर्तनकार ह. भ.प. संगीता महाराज (५०) यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूर हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वैजापूर तालुक्यातील चिचडगाव येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय कीर्तनकार संगीता पवार यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते. सराला बेटाचे महंत नारायणगिरी महाराज व रामगिरी महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. गुजरातमधील वृदांवन येथे पाच वर्ष राहून
मयत हभप संगीता महाराज पवार.

त्यांनी आध्यात्मिक शिक्षण आत्मसात करून परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. वडील अण्णासाहेब पवार यांनी वैजापूर गंगापूर रस्त्यावरील चिचडगाव
जुन्या वादातून हत्या झाल्याचा वडिलांना संशय …माझ्या मुलीची हत्या जमिनीच्या
वादातून झाली असा संशय वडील अण्णासाहेब पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला आहे. पोलिसांनी या घटनेचा छडा लावून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली.
शिवारात दीड एकर जमीन क्षेत्र त्यांना दिले होते. त्या ठिकाणी कन्या आश्रम कामाचा शुभारंभ सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांनी केला होता. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील
आश्रमात एकट्याच वास्तव्यास होत्या. शुक्रवारी मध्यरात्री कीर्तनकार संगीत पवार रात्री झोपेत असताना काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप् तोडून आत प्रवेश केला.

चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य वादातून त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. सकाळी तेथील उपस्थिती एका व्यक्तीने बघितल्यावर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिर्त मिळताच घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, वीरगावचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. श्वान पथकाल याठिकाणी पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत वेगवेगळ्या पथकामार्फत प्रत्येक अँगलने तपास सुरू करण्यात आला आहे. काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकश करण्यात येत आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले
चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान ही घटना चोरीच्या उद्देशाने हत्या केली की, जुन्या वादातून झाली याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान १० एप्रिल रोजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी महिला कीर्तनकार ह. भ.प. संगीताताई महाराज यांचा वाद झाला होता. त्यांची तक्रार त्यांनी वीरगाव पोलिस ठाण्यात केली होती व तक्रारीत त्यांनी माझ्या जीविताला धोका असल्याचे म्हटले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पण आता चोहोबाजूंनी आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपलीय.
समुपदेशन करायचे कुणा कुणाचे? असं असेल तर शिक्षणाचा फायदा काय? शिक्षित आणि अशिक्षितांमध्ये पुसटशी रेषा शिल्लक आहे. मोबाईल स्मार्ट झाले. परंतु माणसं स्मार्ट व्हायला तयार नाही. समाजाने सर्व बदल स्वीकारले. पण एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) युगात बुरसटलेली मानसिकता बदलायला तयार नाही. मुळात अशा घटनांमुळे समाजाला कुणी दिशादर्शक राहिला नाही का? असा प्रश्न आपसूकच पडू लागल आहे.