WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
20250711_1040409208374613131454109.png
छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Crime

Cheque Bounce धनादेश अनादर प्रकरणात 10 महीने सश्रम कारावास 130000/- नुकसान भरपाईचे आदेश

धनादेश अनादरण: आरोपीस 10 महिने सश्रम कारावास
1,30,000/- हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश

धनादेश अनादरण: आरोपीस 10 महिने सश्रम कारावास
1,30,000/- हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश
वैजापूर: येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस 10 महिने सश्रम कारावास तसेच रूपये 1,30,000/- हजार रुपये नुकसाभरपाई फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापुर लां द्यावी व रक्कम नाही भरल्यास अतिरिक्त 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा असे आदेश 2 रे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. के. खान मॅडम यांनी दिले.


याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर यांचे कडून आरोपी   यांनी सदर वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज घेतले होते.
असे की, कर्जाऊ घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे फिर्यादिने आरोपीकडे सदर रकमेची मागणी केली तेंव्हा आरोपीने फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर चां नावाने दि. 13 जानेवारी 2022 रोजीचा रक्कम रूपये 1,06,729/-, चा दि. मर्चंट को. ऑपरेटिवबँक लि., शाखा वैजापूर ता. वैजापूर चा धनादेश दिला. सदरचा धनादेश फर्यादिने त्याचे खाता असलेली बंधन बँक लि., शाखा वैजापूर ता. वैजापूर येथे वटविण्यासाठी टाकला. परंतु पुरेशा रकमेअभावी आरोपीने दिलेला धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला. धनादेश न वटता अनादरित होऊन परत आल्यानंतर फिर्यादिने आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु नोटीस मिळूनही आरोपीने धनदेशाची रक्कम मुदतीत जमा केली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन ॲड. मजहर करीम बेग यांचेमार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद, साक्षीपुरावा व फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर चे वकील adv मजहर करीम बेग केलेल्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे दणका दिला. प्रकरणात फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर तर्फे ॲड. मजहर करीम बेग यांनी काम पाहिले.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.