WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
bindass show
bindass
ताज्या बातम्या नेतानगरी बिंदास Person बिंदास मराठवाडा बिंदास राजकारण

Maharashtra Politics खासदार ओमराजे निंबाळकर फुटलेच कसे?

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचाही समावेश आहे.

  • शिवसेनेत २०२२ मध्ये फूट पडली त्यावेळी ओमराजे खंबीरपणे ठाकरे यांच्या मागे उभे राहिले होते. आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघातही उमटू लागले आहेत.
    कुणीही फुटले तरी ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ठाकरेशी एकनिष्ठ राहतील, असे धाराशिवमधील सेनेचे कार्यकर्ते ठामपणे सांगत होते. खुद्द राजेनिंबाळकर यांनीही अनेकदा २०२२ च्या फुटीनंतर ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
    ‘साम’ने दिलेल्या वृत्तानुसार, राजेनिंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर धाराशिवमधील ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत राजेनिंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे ठरविण्यात आले. याबाबत माहिती देताना एका नगरसेवकाने सांगितले की, लोकहितासाठी कुठलाही निर्णय घेतला तर चांगलंच असतो. शेवटी राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठीच असते. त्यामुळे घेतलेला निर्णय योग्यच आहे. सत्तेत नसल्याने आम्हाला न्याय मिळत नाही. कामे वेळेवर होत नाहीत.
    शिवसैनिक आक्रमक
    ओमराजे यांच्या भूमिकेनंतर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसते. तर काही कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओमराजे शिंदे गटात जात असतील तर ते वेदनादायी आहे. ओमराजे आमच्यासाठी भावासारखे आहेत. त्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले. एवढे करूनही ते असे करत असतील तर निषेधच आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
    दरम्यान, सोशल मीडियात ओमराजे ट्रोल होत आहेत. त्यांच्या विरोधात अनेकांनी सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी तर गंभीर दावा केला आहे. ओमराजे यांच्या वडिलांच्या हत्येच्या केसचा निकाल त्यांच्या बाजूने देण्याची ऑफर ओमराजेंना दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. काल या प्रकरणाचा मुंबईतील कोर्टाकडून निकाल दिला जाणार होता. पण निकालाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. त्यावर राऊत यांनी हा दावा केला आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.