ताज्या बातम्या नेतानगरी

कमळ हाती घेणार का डॉक्टर!

डॉ दिनेश परदेशी विधानसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार पाहीजे अस म्हणत जनतेने डॉ परदेशी ठाकरे गटात यावेत याकरीता अगदीच देवही पाण्यात ठेवले होते.जनतेचे अस्सिम प्रेम बघून डॉक्ट दिनेश परदेशी संभ्रमात पडले आणि जन आग्रहाखातर त्यांनी शिष्टमंडळासह ठाकरेंची भेट घेत निर्णय घेतला शिवसेना ऊबाठामध्ये जाण्याचा!


यानंतर पंधरा तारखेच्या जाहीर सभेत प्रवेश होता होता राहीलाच !
नक्की काय कारण हा तर्कवितर्काचा विषय परंतु प्रवेश का रोखला गेला याबद्दल डॉक्टर दिनेश परदेशी हे कधीच बोलले नाही.माञ राजकारणात सक्षम नेते असणे काळाचा गरज बनली आहे.
यातच विद्यमान आमदार शिवसेना शिंदेंच्या पक्षप्रतोद पदी आमदार प्रा रमेश बोरनारे यांची निवड झाल्याने वैजापूरच्या राजकारणात तगडा विरोधक सत्ताधाऱ्यांकडून डावललेल्या जनतेसाठी मैदानात हवाच अशी चर्चा आहे.विधानसभेच रणशिंग फुंकलं गेल आणि विवीध टिका-टीपण्णी होत असलेली प्रचार मालिका थंडवत तेवीस तारखेला निकाल लागला..


सुमारे 93000/- पेक्षा अधिक मते घेण्यात डॉक्टर दिनेश परदेशी यशस्वी झाले.परंतु या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला.आता अगदीच काही महीन्यात नगरपालिका,महानगरपालिकांच्या निवडणूका होण्याची चिन्ह दिसत असताना डॉक्टर विरूद्ध मास्तर लढाई तगडी होईल यात शंकाच नाही.परंतु आता डॉक्टर परदेशी नेमका काय निर्णय घेतील यावर जनचर्चेवर आधारीत बिंदासचा राजकीय आखाड्यातील हा खास रिपोर्ट

विधानसभेत लक्षवेधी भुमिका घेत रणांगन गाजविणारे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये यांव असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.तसेच भाजप नेते मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्याशी दृढ संबंध असेलेले परदेशि हे ऐणवेळी काय निर्णय घेतील हे अद्याप स्पष्ट नाही.परंतु नगरपालिकेची निवडणूक ते भाजपकडून लढतील याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ दिनेश परदेशी यांच्यात आणि मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्यात भेटी दरम्यान सर्व प्लानिंग ठरल्याची चर्चा आहे.अस असले तरी या सर्व गोष्टीॆवर अद्याप डॉ दिनेश परदेशींनी स्पष्टीकरण दिलेल नाही.
आगामी काळात सत्तेत भाजप असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता महत्वाची आहे,म्हणून सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडवा असा अट्टाहास कार्यकर्त्यांचा आहे.परदेशी हे जर भाजपमध्ये गेले तर नक्कीच आमदार बोरनारे आणि डॉ दिनेश परदेशी यांच्यात नगरपालिका धुमशान होईल.

परंतु डॉ दिनेश परदेशींनी जर शिवसेना ऊबाठा सोडली तर तालुक्यात शिवसेना ऊबाठाला माञ घर घर लागणार हे माञ नक्कीच .

पक्षाला घरघर कशी लागली पाहूयात,तिकीट मिळत नसल्याच पाहून अगोदरच विधानसभेपुर्वी माजी आमदार भाऊसाहेब तात्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली.,त्यानंतर संजय निकम यांनी पक्षाला राम-राम ठोकला.आणि आता परदेशिंनी जर ऊबाठाला जय महाराष्ट्र केला तर माजी पंचायत समिती सभापति,जिल्हा परीषद सभापतींस सदस्यसुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र करू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यात भाजप पुन्हा बळकट होणार आणि यावेळी माञ पुर्वीपेक्षा भाजपची ताकद वाढणार असल्याचे संकेत लवकरच स्पष्ट होतील.परदेशींच भाजपमध्ये कमबँक हे माञ काही स्थानिक भाजप नेत्यांना पचणी पडणारी गोष्ट राहीलेली नाही यामुळे त्यांना पक्षात येण्यासाठी स्थानिक पातळीवर विरोध सुरू असल्याचीही चर्चा आहे.परंतु राजकारण बीरबल असलेले डॉ दिनेश परदेशी हार मानतील ते कसे?


राज्यातील भाजप नेत्यांसोबत वरीष्ठ पातळीवर असलेला दांडगा जनसंपर्क त्यांना पुन्हा कमळ देऊन त्यांच स्वागत करू शकतात!
यासाठी काही कार्यकर्त्यांनी तर आत्तापासूनच देव पाण्यात ठेवायला सुरूवात केली आहे.

याशिवाय त्यांच्यासोबत ऊबाठात पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक हे सोशल मिडीया किंवा दैनंदीन फलकबाजीकरीता पक्ष नांव कींवा चिन्हाचा अजिबातच वापर करत नाही.यावरून ऊबाठा पक्षाची विचारधारा भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांना मान्य नाही हेच सिद्ध होतय.परंतु कठीण काळात नेत्याच्या निर्णयात सहभागी व्हायच हे व्यक्तीनीष्ठत्वाच दर्शन घडवत. अनेक नगरसेवकांनी भाजप कमबैकींगची इच्छा मनातच दाबून ठेवलीय.


राजकीय गणित ही वेळेवर आणि वेळेनूसार बदलतात यांमुळे अद्याप पक्ष सोडणार की पक्षप्रवेश करणार याबद्दल डॉ दिनेश परदेशींनी स्पष्टता व्यक्त केली नाही.केवळ कार्यकर्ते आणि जनता त्यांच्यासाठी आग्रही असल्याच समजत
थांबूया इथेच चैनलवर जर आपण नविन असाल तर चैनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन दाबायला ही विसरू नका..
ब्रेकींग बातम्यांच्या अपडेटसाठी भेट द्या bindassmedia.com या संकेतस्थळाला… धन्यवाद !

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.