समाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू कारण समाजाची कामे केल्याशिवाय राजकारण होत नाही आणि राजकारणाशिवाय समाजसेवा!
अशातच वेगवेगळे व्यक्तीमत्व आपल्या कामाच्या हातोटीने परीचीत आहेत प्रचलित आहेत.

परंतु एक असा युना नेता जो त्याच्या बिंदास आणि निर्भीड बोलीभाषामुळे चर्चेत आला आहे.महालगांव गटातील ,नागमठाण गावच युवा नेतृत्व पवन चव्हाण यांच हे ऊदाहरण! एम कॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या पवन चव्हाण यांनी शिवसेना शिंदेगटाच्या वाटेवर जात समाजसेवेचा वसा हाती घेतला.युवासेनेचे विभागप्रमुख म्हणून काम करत आमदार बोरनारे यांचे ते विश्वासू शिलेदार बनले.याशिवाय आमदार बोरनारेंसह त्यांचे निकटवर्तीय रणजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ते समाजसेवेचे धडे गिरवत आहेत.
नागमठाणसह पंचक्रोशीत व महालगांव गटात नागमठाण गणात सामाजिक आणि अध्यात्मिक कामात पवन चव्हाण अग्रेसर राहीलेत.नागमठाण माळी घोगरगांव या रस्त्यासाठी त्यांनी आमदार बोरनारेंच्या नेतृत्वात प्रयत्न केले.गोदावरी नदीवर नागमठाण ते महांकाळ वाडगांवचा म्हणजेच श्रीरामपूरकडे जाणाऱ्या उंच पुलाच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महत्वाची भुमिका बजावली.दोन्ही बाजून जवळपास पावनेतीन कोटी रुपयांचा रस्ता काम व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते.बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांनी पाठपुरावा केला.

जनतेच्या आरोग्यसेवेत पवन चव्हान यांनी मोलाची भुमिका बजावली.तहसिल स्तरावर जनतेच्या विवीध कामासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले.रुग्नांना विवीध संस्थाकडून मदत मिळवून देण्यात चव्हाण यांनी मोलाची भुमिका निभावली.
संजय गांधी,श्रावण बाळ यांसारख्या निराधारांची प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावण्यासाठी चव्हाण यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला.

आमदार प्रा रमेश बोरनारे यांचे ते लाडके शिलेदार बनले.तरुणांचे पाठबळ,नागमठाण परीसरात योग्य नेटवर्क बांधणी त्यांनी केली आहे.विवीध कामांमुळे महिलांना मिळालेले सहकार्यामुळे चव्हाण यांना सर्वच स्तरात आशिर्वाद मिळत गेलेत.त्यांनी निवडणूक लढवावी ही ज्येष्ठांची मनापासूनची ईच्छा! याशिवाय अध्यात्मिक क्षेञात सर्वच महाराज मंडळींचा मिळालेला आशिर्वाद हा बहुपयोगी ठरेल असा विश्वास त्यांना आहे.
आगामी होणाऱ्या जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणूकीच्या राजकीय आखाड्यात चव्हाण दिसू शकतात.आमदारांनी संधी दिली तर या संधीच सोन करणारे पवन चव्हाण हे त्या भागातील पहीले युवा होतील हे जनसामान्यांना वाटते !
आपल्याला पवन चव्हाण यांच्याबद्दल काय वाटते हे लिहायला विसरू नका !