WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
bindass show
bindass
छञपति संभाजीनगर विशेष नेतानगरी बिंदास महाराष्ट्र बिंदास राजकारण

Bindass News :आमदार बोरनारेंनी वाढवीला वैजापूरचा बहुमान! पुढचे निर्णय महत्वाचे ठरणार!

वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे मानाचे पान मिळाले असून यामुळे मतदारसंघात आनंद व्यक्त होत आहे. एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पिछेहाट सहन करावी लागली.

आगामी काळात जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमदार प्रा रमेश बोरनारे यांना आपले शिलेदार ऊभे करुन नगरपालिकेचा वचपा काढण्यासाठी नामी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे परंतु योग्य उमेदवारास संधी मिळाली तरच हे शक्य होईल अशी चर्चा रंगत धरून आहे.

पक्षांच्या मुख्य प्रतोदांना मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयानुसार शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनाही मंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या निधनानंतर तब्बल ५६ वर्षांनंतर वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे मानाचे पान मिळाले असून यामुळे मतदारसंघात आनंद व्यक्त होत आहे. एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पिछेहाट सहन करावी लागली असतानाच, दुसरीकडे

बोरनारे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याने शिवसेना गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवामुळे बोरनारे समर्थकांमध्ये काहीशी निराशा पसरली होती. विशेषतः नगराध्यक्षपदासाठी बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला. ही निवडणूक आमदार बोरनारे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. गेल्या सहा वर्षांत वैजापूर शहर व परिसरात झालेल्या विविध विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. मात्र भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या १६ जागा जिंकत नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवले.

पुढील राजकीय दिशा काय?

मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने आमदार बोरनारे यांचा पक्षातील आणि शासनातील प्रभाव वाढणार आहे. या दर्जाचा उपयोग ते पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच वैजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी कितपत करून घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकीतील पराभवातून सावरण्यासाठी हा निर्णय शिवसेनेसाठी संजीवनी ठरतो का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

विनायकराव पाटील यांच्यानंतर पहिल्यांदाच मान !

वैजापूर तालुक्यात आतापर्यंत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी सहकारमंत्री स्व. विनायकराव पाटील यांनाच मंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्या खालोखाल आता आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने तालुक्याच्या राजकीय इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याची भावना ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.

संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज

या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटातून ‘घरच्या भेदींमुळेच पराभव झाला’ असा आरोप केला जात आहे. बोरनारेंना ‘पराभव’ सहज पचविला असता, परंतु ‘गद्दारी’ पचविणे त्यांना अवघड जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्वाला संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षण करून ‘आपले कोण आणि घरभेदी कोण’ याचा शोध घेत नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. तथापि, आता या निकालावर फारसा ऊहापोह करून उपयोग नाही, अशी भावना पक्षांतर्गत व्यक्त होत आहे. आ. बोरनारे हे २०१९ पासून वैजापूर मतदारसंघात सलग विजयी होत असून, त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी खेचून आणला आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.