WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
bindass show
bindass
छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास भिडू

Biography Bindass :ऊसतोड कामगार ते बाजार समिती संचालक अन आता पंचायत समितीकडे ! सुरेश आल्हाट यांचा जिवनप्रवास !

महाराष्ट्र म्हणजे संस्कृती विकास आणि ऐतीहासीक वारस्यातून ऊभारलं जाणार धगधगत्या नेतृत्वांच कतृत्व गाजविणार सुंदर राज्य !
या सुंदर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुशोभीत करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलय ते म्हणजे गावच्या गल्लिपासून ते दिल्लीपर्यंतचे विवीध नेतृत्व !


आज अशाच एका गावखेड्याकडून कतृत्वाच्या जोरावर उंच मजल मारू पहाणाऱ्या ऊसतोड कामागाराच्या पुञाबद्दल जाणूय घेऊया बिंदास भीडूच्या या भागात!
शेतकरी कुटूंबातून आणि ऊसतोड हा मुळ व्यवसाय असलेल्या ऊसतोड कामगाराच्या घरात जन्मलेल्या महालगांवचे सुपूञ सुरेश भाऊसाहेब आल्हाट यांचा हा प्रेरणादायी प्रवास!


राजकीय वारस्याकडे पदार्पण करणारे सुरेश आल्हाट हे 1999 ते 2002 म्हणजे शालेय जिवनापासूनच अविनाश गलांडे यांचे खंदे समर्थक आहेत.2007 ला अविनाश गलांडे यांच्या प्रचारानिमीत्त सुरेश आल्हाट यांची राजकारणात एंट्री झाली.2012 ला त्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली.आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले.यावेळी त्यांना उपसरपंच पदाचा कारभार पाहन्याची संधी प्राप्त झाली.2016 ते 2022 बाजार समिती निवडणूक लढून ते पुन्हा विजयी झाले.आणि त्यांनी संचालक पदाचा कारभार पाहीला.
2022 महालगांव ग्रामपंचायत निवडणूक लढवत विजयी झाले आणि 2024 ला उपसरपंच म्हणून पुन्हा गावचा कारभार पहान्याची संधी त्यांना प्राप्त झाली.

त्यांच्या कार्यकाऴात सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचे त्यांना मोठे योगदान प्राप्त झाले.2012 ला अविनाश पाटील गलांडेंच्या नेतृत्वात नविन जिल्हा परीषद शाळेच बांधकाम करण्यात आलं. दलित वस्तीत पाणीपुरवठा करण्याच काम त्यांनी केल.

2013-14 ला लंत जनार्दन स्वामी पाणीपुरवठा योजनेसाठी महत्वाचे पाऊल त्यांनी ऊचलले.2019 ला माता रमाई आवास योजनेतून 62 घरकूल मंजूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.2020 ला कोरोना काळात अविनाश पाटलांच्या नेतृत्वात क्वारंनटाईन सेंटर सुरू करून रुग्णसेवेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.2022- 2023 ला अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा परीसर सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

एकलव्यांच स्मारक सुशोभीकरण करून आदीवासी वस्तीवर नळयोजना व जलकुंभ बांधून पाणीप्रश्न सोडवीला.गावात पथदीवे,दलितवस्तीतून सिमेंट रस्त्यांची कामे त्यांनी केले.गावात पथदीवे लावत अंधारातील गांव प्रकाशमय केले.2023-2024 ला माता रमाई योजनेंतर्गत 63 घरकूल बांधण्यात आले.पीएम आवास योजनेतून 216 घरकूलांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.राजमाता अहील्यादेवी होळकर योजनेतूनही 9 घरकूल त्यांनी मंजूर करण्यात पुढाकार केला.वैयक्तीक लाभ देण्यासाठी 133 विहीर मंजूर केल्या पैकी 68 पुर्ण झाल्या आहेत.अभ्यासिका केंद्राचे बांधकाम केले.नऊ वस्त्यांमध्ये सिमेॆट रस्ते पुर्ण केले.

2024-25 ला आरोग्य केंद्रा,वीज,शुध्द पाणी ,शाऴेला शुद्ध पाणी जिल्हा परीषद शाळा डिजीटल ई प्रणाली राबवली.5 अंगणवाड्यांना फर्निचर व खेळणी उपलब्ध करून दिली.

वेगवेगळी मंदीर बांधकामकरूता सप्ताहात देणगी देत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.राजकीय अध्यात्मिक क्षेञात त्यांचे कार्य उल्लेखणीय ठरले.
बुद्धविहाराच्या कामासाठी वेळो-वेळी पाठपुरावा करण्यात त्यांचे योगदान राहीले आहे.सुरेश आल्हाट हे नेतृत्व आता महालगांव गणासाठी अविनाश पाटलांच्या वरदहस्ताने पंचायत समितीच्या आखाड्यातील कुस्तीचे प्रबळ दावेदार बनले आहेत.याकामात त्यांना अनेक दिग्गजांनी सहकार्य केले.

प्रामुख्याने अविनाश पाटील गलांडे,डॉ अभयदादा थावरे,कैलास पाटील शेळके,पुंजाराम काळे,केशव पा शिनगारे,आबासाहेब काळे,विजय झिंजुर्डे,देविदास जाधव चार्लस आल्हाट,दादारुंझा आल्हाट,हरीभाऊ आल्हाट,राजेंद्र हुमे यांच्यासह कैलासवासी मधुकर थावरे यांचे योगदान लाभले.

सामाजिक प्रश्न सोडविताना सरपंच रोहीणी आबा काळे,सुधाकर पाटील गलांडे,लताबाई भाऊसाहेब हुमे,शितल राहुल आल्हाट,सोनम सतिष आल्हाट,सत्यभामा ऊत्तम मतकर,लिलाबाई डिंगबर आल्हाट,मधुकर पा शेळके,रुपाली संपत जाधव यांच्या सहकार्यामुळे आमि मायबाप जनतेच्या आशिर्वादाने सुरेश आल्हाय यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाचा इथवरचा प्रवास यशस्वी ठरला.
जर पंचायत समिती सदस्य पदाकरीता संधी प्राप्त झालीच तर सुरेश आल्हाट हे नांव तालुकाभरात आपल्या कार्यशैलीने ऊजळून निघेल हे माञ नक्की !

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.