छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Devotional News -गोदावरीच्या तीरावर 178 वा अखंड हरीनाम सप्ताह

गोदावरी नदीच्या काठावर होणार गंगागिरीजी महाराज यांच्या 178 व्या सप्ताहाचा महा कुंभ


शनिदेव गाव सप्ताह सप्ताक्रोशीतील नियोजन समितीची बैठक संपन्न

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान गोदाधाम श्री क्षेत्र सरला बेटाचे योगिराज गंगागिरीजी महाराज यांचा नियोजित,178 वा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीचा शनिदेव गाव परिसरातील सप्त क्रोशीत होणार असून नुकतेच जागा पाहणे निश्चिती होऊन सप्ताह सप्तक्रोशितल गावातील नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.


गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असलेला आशिया खंडात सर्वात मोठा असलेला योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह श्रावण महिन्यात संपन्न होत असतो.

यावर्षीचा नियोजित अखंड हरिनाम सप्ताह शनिदेव गाव सह बाजाठाण, चेंडूफळ ,आवलगाव, हमरापुर, कमलपूर, भामाठाण, या सप्त क्रोशीत होणार असून महंत रामगिरीजी महाराज यांनी जागा पाहणे निश्चित केली असून सप्ताह समिती स्थापन करण्यात आली, या समितीची नुकतीच नियोजन बैठक संपन्न झाली.

आतापर्यंत जागा जेसीबी द्वारे सपाटीकरण काम पूर्ण करण्यात आल्या असून आता मंडप उभारणी पार्कींग व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था,वाढवण्यासाठी लागणारे तरूण मंडळ, महिला मंडळ वेगवेगळ्या प्रत्येक गावातील 200 तरूण 100 महिला अशा प्रकारे समित्या स्थापन करण्यात आल्या असून अंदाजे 30 लाख लोक उपस्थित राहतील असे गृहीत धरून नियोजन करण्यात येणार आहे गोदावरीच्या काठी निसर्गरम्य वातावरणात या सप्ताहाचे स्थानातून जवळच आशुतोष महादेव मंदिर आश्रम असून येथे महंत रामगिरीजी महाराज यांचे 14 वर्ष वास्तव्य होते.

त्यामुळे या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला गोदाधाम सरला बेटाचा सप्ताह ऐतिहासिक ठरावा असे मनोदय आहे त्यानुसारच 300 ते 400 एकर परिसरात नियोजन चालू असून वारकऱ्यांचा महा कुंभ समजला जाणारा योगराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह गोदावरी काठी प्रति पंढरीच वसल्या जात असल्याचे दिसत आहे यावेळी राम दरबाराचे हरिशरण गिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज ,श्रीक्षेत्र सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज,शनिदेवगाचे योगानंद महाराज माजी सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्यासह सप्त क्रोषीतील नियोजन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.