मराठा बांधवांच्या हक्कासाठी मुंबईत सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या नेतृत्वात राज्य भरातून कोट्यवधी मराठा समाजबांधव मुंबईला आंदोलनासाठी गेला होता.

या आंदोलनात बोरसर ता वैजापूर संभाजीनगरचे राजेंद्र लहानु पवार हे सुद्धा सहभागी झालेले होते.
आरक्षण मिळाल आणि या आंदोलनाहून परतत असताना त्यांच्या छातीत अचानक ञास सुरू झाला.

आणि जांबरगांव च्या टोलनाक्यावर असताना त्यांना ह्रद्य दौरा म्हणजेच हर्टअटैक चा तीव्र झटका आला आणि ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.वैजापूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
छावा संघटनेचे ते जिल्हा उपाध्यक्ष होते तर मराठा क्रांती मोर्चाचे सक्रीय सदस्य सहभागी होते.