छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

पाटबंधारे विभागात चक्क ठेकेदार झाले सेवा निवृत्त अधिकारी

वैजापूर : पाटबंधारे विभागात अनागोंदी; मोजक्या ठेकेदारांना झुकते माप

पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत करावयाच्या विविध कामांत मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि अनागोंदी झाल्याचे एक-एक प्रकरण आता समोर येत आहे.

देखभाल व दुरुस्तीच्या शेकडो कामांचे वाटप ठराविक ठेकेदार

येथील पाटबंधारे विभागाने शासकीय नियम धाब्यावर बसवून देखभाल व दुरुस्तीच्या शेकडो कामांचे वाटप ठराविक ठेकेदार, मजूर सोसायट्या आणि मर्जीतील अभियंत्यांना दिली जात असल्याच्या सावळागोंधळामुळे बनावट कामाच्या टक्केवारीचा वणवा खुलेआम ऐकायला मिळत आहे.

ठराविकांनाच काम, बाकीच्यांचे हातावर हात

आश्चर्य म्हणजे, कामे वाटपादरम्यान टोलच्या नावाखाली मयदिपेक्षा जास्तीचा प्रोटोकॉल पाळण्यात आल्याची चर्चा आहे.

‘ते’ ठेकेदार, अधिकारी कोण ?

धक्कादायक म्हणजे कामे वाटपासह इतर अनेक बाबींत वैजापूर पाटबंधारे विभागातील काही अधिकारी तसेच काही सेवानिवृत अधिकारी सक्रिय असून, त्यांनी काही ठराविक ठेकेदारांच्या नावावर देखभाल दुरुस्तीचे लाखो रुपयांच्या कामात भागीदारीने ठेकेदारी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी आखलेल्या रिंगणाबाहेर अनेक कर्मचारी जाणे टाळत असल्याचेही समोर येत आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून मतेफ ठेकेदार अधिकारी कोण? याचा शोध घेऊन चौकशी करावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाशी संबंधितांमध्ये आहे.

पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत जलसंधारणाच्या विविध कामांसह कालवे व वितरिकांची दुरुस्तीसाठीची अन्य कामे मोठ्या प्रमाणात दरवर्षी करण्यात येतात. यासाठीचा निधी विविध योजनांतून तसेच जिल्हा नियोजन समितीकडूनही त्या विभागास उपलब्ध होत असतो.

निधी उपलब्धतेनंतर कामांच्या याद्या व इतर तांत्रिक प्रक्रिया पाटबंधारे विभागाकडून पार पाडण्यात येते.

ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच बोलाचाली आणि आपला, जवळचा, माझा अशा नोंदी त्यासाठीच्या कागदांवर पेन्सिलने होतात, असे अनेकजण खासगीत

अभियंत्यांना झुकते माप देण्यात येते.

सांगत आहेत. कामे वाटपादरम्यान, कागदोपत्री तांत्रिक पूर्ततेच्या बाबी पाळण्यात येत असल्याचे व त्यावेळी ठराविकच मजूर सोसायट्या, अभियंत्यांना झुकते माप देण्यात येते.

तांत्रिक पातळीवर वाटणारे हे काम वरवर पारदर्शी वाटत असले तरी त्यात सावळागोंधळच असतो, ठराविक ठेकेदार, मजूर सोसायट्यांवर कामांचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे उर्वरितांना हातावर हात धरून बसावे लागते.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार बिनबोभाट सुरू असून, त्याची कल्पना वरिष्ठांना असूनही त्यांनी सोयीस्कर त्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चाही पाटबंधारे विभागाशी संबंधितांमध्ये आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.