छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या रोखठोख

शिवनाधाम-हेमाडपंथी मंदिर नवनिर्माणाचा भाविकांचा संकल्प

दिशाहीनांचा दिशादर्शक म्हणजे गुरू-महंत नारायणानंद सरस्वति

शिवनाधाम-हेमाडपंथी मंदिर नवनिर्माणाचा भाविकांचा संकल्प

छञपति संभाजीनगर जिल्ह्यातील देवगांवपासून अगदीच काहीशा अंतरावर शिवनामाईच्या तीरावर वसलेले एक टूमदार बेट म्हणजे श्री क्षेञ शिवनाधाम .
या ठीकाणी प्रभो गुरूदत्त शिवस्वरुप अवतारी चैतन्य कानिफनाथांची स्वयंभू मुर्ती स्थापीत आहे. गेल्या 15 वर्षांपासून येथे हजारो भाविकांची वर्दळ सुरू असते. भाविकांचे असे मानने आहे की,येथे माथा टेकवल्यानंतर वेगवेगळे साक्षात्कार आणि दिव्य अनुभव प्राप्त होतात.या ठीकाणी अंधश्रद्धेस खतपाणी घातले जात नसताना शुद्ध अंतकरणाने भाविक येतात आणि मनातली ईच्छा व्यक्त करतात.या पायरीला ज्यांचे हात लागतात त्यांच्या अडचणी दत्तप्रभो,शिवस्वरुप कानिफनाथ आपोआप दूर करतात अशी ख्याती आहे.आजवर हजारो भाविकांनी या ठीकाणी अनुभव घेतले आहेत.

गुरूपौर्णीमेनिमीत्त गुरूवर्य महंत श्री नारायणानंद सरस्वतिजी महाराज यांच्या अमृतवाणीतून भाविकांनी अमृतपान केल.गुरू कधीच आपलं कौतुक करत नाही…तो आपल्याला चुकतंय तिथून उचलतो,चुकीच घडतंय तिथं थांबवतो,
आणि सामर्थ्य आहे तिथं धाडतो!भक्त वाट बघतो चमत्कारांची,
पण गुरू शिकवतो –
“मेहनतच खरा चमत्कार आहे!”
तो तुमच्या प्रार्थनांना तातडीनं उत्तर देत नाही…कारण तो तुम्हाला स्वतःच उत्तर बनवायला शिकवतो!गुरूची शिकवण थेट असते, पण प्रेमळ असते…”अभक्त होऊन देव मागण्यापेक्षा,शिष्य होऊन स्वतः घडवा!””देवावर श्रद्धा ठेवा, पण कर्मावरही जबाबदारी ठेवा!””रडू नका… कारण देणारा थांबलेला नाही.तो फक्त बघतोय – तूम्ही तयारीत आहेत का ते!”
गुरू भक्ताला फक्त भक्ती शिकवत नाही…
तर भक्तीतून शक्ती कशी उभी करायची हे शिकवतो!माझ्यावर नाही, स्वतःवर विश्वास ठेवा.कारण तूम्ही माझे आहात आणि गुरू नेहमी शिष्याच्या काळजीत असतो गुरूवर निष्ठा ,भगवंतावर श्रद्धा ठेवा पण कर्मावरचा विश्वास ढळू देऊ नका असे प्रतीपादन श्री क्षेञ शिवना धाम चैतन्य कानिफनाथ भुमी आश्रम धारणखेड्याचे मठाधिपती गुरवर्य महंत नारायणानंदजी सरस्वति महाराज यांनी भाविकांना उपदेशीत करताना केले.

शिवना धाम च्या विकासाठी भाविकांची वज्रमूठ,मंदिर नवनिर्माणाचा संकल्प

गुरूपौर्णीमेनिमीत्त सकाळी सात वाजता प्रभो गुरूदत्तांच्या मुर्तीसह चैतन्य कानिफनाथांच्या प्रतिमेस व चरणपादूकांना अभ्यंग स्नान घालण्यात आलं.यानंतर भाविकांसोबत झालेल्या सत्स्ंगात भाविकांनी सद्यस्थापीत कानिफनाथांच्या मंदिराजवळील असलेल्या शिवनामाई तीरावर भव्य दिव्य असा मंदिर नवनिर्माण प्रकल्पाचा एकञीत संकल्प केला. श्री क्षेञ शिवना धाम येते गुरूवर्य महंत नारायणानंदजी सरस्वति महाराजांची ध्यान कुटीया,व मंदिरासह सभागृह बांधण्याचा संकल्प यावेळी भाविकांनी केला.

मंदिर निर्माण कार्य-पहिला संकल्प 101 वृक्षलागवडीसाठी भाविकांनी आपल्या परीवारातील स्वर्गवासी झालेल्या सदस्यांच्या स्मरणार्थ नारायण नागबलीसारख्या पुजा विधी टाळून मंदिर नवनिर्माण कार्याचा पाया रचत असताना वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला.आषाढच्या शेवटी आणि श्रावणाच्या सुरूवातीला वृक्षलागवडीचा योग्य काळ असल्याने या 101 झाडांची लागवड नियोजीत जागेवर होणार आहे.
लवकरच मंदिर नवनिर्माणासाठी महाराष्ट्रातील काही मंदिरांचे नमुने पाहून संबंधित अभियंत्यांच्या मार्गदर्शनातून हा भव्य प्रकल्प सुरू केला जाणार आहे.यावेळी मंदिर , मठ आणि शिवनाधामच्या संगोपण,संवर्धानासाठी अकरा पुरूष आणि अकरा महिलांची समिती गठीत करण्यात आली आहे.
आरती व महाप्रसादासह अनुग्रह देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.