दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर च्या वैजापुर तालुक्यातील चिंचडगावात कीर्तनकार महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या आश्रमात शिरून ह. भ. प. संगीताताई महाराज पवार यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

त्यांच्या हत्येच्या मध्यरात्रीस चोरट्यांचा एक चोरीचा प्रयत्न करतानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आला आहे.

तर आश्रमातून दोन दानपेट्या चोरीला गेल्या होत्या, त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा अंदाज
पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता.

या चोरट्यांच्या हातात हत्यार देखील दिसत आहे.
हल्लेखोरांनी सीसीटीव्ही फोडण्याचाही केला प्रयत्न
विशेष म्हणजे याच गावात दुसऱ्या दिवशीही म्हणजे काल मध्यरात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना देखील घडल्या आहे . या घटनेमुळे गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.