छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र बोलका दणका रोखठोख

178 व्या सप्ताहात भाविकांना मिळणार ह्या सुविधा -विखे पाटलांची घोषणा

गंगागिरीजी महाराज 178 व्या सप्ताहात भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार- जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गोदावरी तीरी योगिराज गंगागिरीजी महाराज यांच्या 178 व्या सप्ताह कार्यालयाचे उद्घाटन

शनिदेव गाव सप्त क्रोशीत होणारा योगीराज सद्गुरू गंगागिरी ची महाराज यांचा 178 वा अखंड हरिनाम सप्ताहात लाखो भाविक उपस्थित राहत असतात यांना रस्ते, पाणी, आरोग्य अशा अनेक बाबतीत तुमच्या मूलभूत सुविधा लागतील त्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन शनिदेव गाव येथे सप्ताह कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


भाविकांसाठी महा कुंभमेळा समजला जाणारा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 178 वा सप्ताह यावर्षी शनिदेव गाव, चेडुकळ, बाजाठाण,अव्वलगाव ,हमरापुरकमलपुर ,भामाठाण , सप्त क्रोशीत गोदावरी तीरी आयोजित केला असून अद्याप जागेची सपाटीकरण 200 ते 300 एकर परिसरात सुरू आहेत आज या अखंड हरिनाम सत्ता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित असलेले जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शनिदेव गाव व सप्त कृषीत होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहसाठी जागतिक विक्रमी गर्दी पाहिला मिळते

यासाठी सप्ताह स्थळापर्यंत येणारे रस्ते यामध्ये टाकळीभान ते घूमदेव कमलपूर ते शनिदेव गाव ,भोकर फाटा ते भामाठाण कमलपुर, मांकाळ वाडगाव ते नागमठाण मार्गे शनिदेवगाव असे अनेक रस्ते तात्काळ कामे पूर्ण करणार असून शनिदेव गाव येथे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारा गोदावरी नदीवरील ऊच्चपातळीचा बंधारा लवकरच काम सुरू करणार असल्याचे विखे पाटील यावेळी म्हणाले, गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असलेला हा भारतातील सर्वात मोठा सप्ताह दोनशे वर्षांपूर्वी गंगागिरीजी महाराजांनी लेने को हरिनाम देणे को अन्नदान या उक्तीला धरून सुरू केला या सप्ताहामधून हिंदू धर्माची लाखो भाविकांना शिकवण मिळते हिंदू सनातन धर्माचे जागरण या सप्ताहातून होत असते. लवकरच या सप्ताहाचे धर्म ध्वजारोहण पार पाडणारा असून सप्ताहाची जयत्त तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.


या प्रसंगी प्रमुख उपस्थित गोदावरी धामचे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज , हरिशरण महाराज, संदिपान महाराज, योगेंद्रगिरीजी महाराज,आमदार रमेश पा बोरणारे,डा दिनेशभाऊ परदेशी,नितीनजी दिनकर,आविनाश पा गंलाडे,दिपक आण्णा पटारे,बाबासाहेब पा चिडे,श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, आदींसह शनिदेव गाव सप्त क्रोषीतील हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थित होते.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.