छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Person बिंदास भिडू बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Success Story: करंजगावच्या तरूणानं,बेताच्या परिस्थितीला फाडत, गाठली यशकीर्तीची ‘गगणभरारी’

मंगलमुर्ती ऊद्योग समूह ऊभारून,करंजगावच्या तरूणान निर्माण केल शुन्यातून विश्व

करंजगांव/छ.संभाजीनगर : कधीकाळी फाटक्या परिस्थितीने त्याला अनेकदा रडवीले,शेतकरी कुटूंबात जन्मलेला तो दर महिन्याला नविन तोंड फाडून बसलेल्या संकटाशी दोन हात करत राहीला. त्याच नांव म्हणजे दादासाहेब ऊत्तमराव मगर

जेमतेम शेती,बहीणींची जबाबदारी,आई-वडीलाचे आजारपण,भाच्यांचे शिक्षण आणि त्यानंतर भाच्यांचा विवाह

वडीलांचे छञ हरपले,पतण्या,भाऊ व परीवाराच्या साथीने दुखा:च्या हजारो दऱ्या ओलांडून तो सुखाच्या शोधात काबाड कष्ट करत राहीला. जेमतेम शेती,बहीणींची जबाबदारी,आई-वडीलाचे आजारपण,भाच्यांचे शिक्षण आणि त्यानंतर भाच्यांचा विवाह या जबाबदाऱ्यांच त्याला कधीच ओझ वाटल नाही कारण तो युगप्रवर्तकासारखा हिंम्मतवान निघाला.

आयुष्याची सुरूवात त्याने साडे तीन हजारांच्या कुलपीक्सने

आयुष्याची सुरूवात त्याने साडे तीन हजारांच्या कुलपीक्स कैमऱ्यापासून केली.पण वस्तूपेक्षाही सरस त्याच्याकडे कुशल कला होती.त्यामुळे फोटोग्राफी व्यवसायात त्याला यश मिळत गेले.हळू-हळू काळ बदलत गेला तसा त्याच्याकडील डिजीटल यंञे ,जसे की कैमरे,कंप्युटर,सॉफ्टवेअर इतर प्रणाल्या अद्यावत झाल्या.

सर्व कार्य निर्वीघ्न आणि मंगल होत गेले. त्याने त्याच्या या नविन साम्राज्याला नांव दिले

फोटोग्राफीने त्याने संपन्न केलेला जनतेचा विश्वास त्याला वेगळी दुनिया निर्माण करण्यास मदत करू लागला आणि आज याच फोटोग्राफीच्या मदतीने त्याने जिल्हाभरात नावलौकीक केलाय.पुतण्या,मुलगा आणि कुशल वर्कर यांच्या मदतीने सर्व कार्य निर्वीघ्न आणि मंगल होत गेले. त्याने त्याच्या या नविन साम्राज्याला नांव दिले ” मंगलमुर्ती ऊद्योग समूह” .

सोलर फीटींगच्या कामामुळे चार बेरोजगारांना रोजगार

इलेक्ट्रीकल गोष्टींची कला आत्मसात असल्याने त्याने आता सोलर फीटींगसाठी परीसरातील शेतकऱ्यांना मोलाचे योगदान दिले. सोलर फीटींगच्या कामामुळे चार बेरोजगारांना रोजगार मिळाला आणि करंजगावचा दादासाहेब मगर हा युवक जिल्हाभर गाजला.

परफेक्ट साऊंडमुळे मंगलमुर्ती साऊंडवाला हवाच

पुतण्या आणि मुलगा पुढे सर्वच कामात हस्तक्षेप करत दादासाहेब यांना मदत करू लागले.हळू-हळू मुल काम करताय हे पाहून दादासाहेब यांनी काळाच्या गरजेनुसार मंगलमुर्ती साऊंड सिस्टम अँड लाइटस नावाने एक डिजेची गाडी सुरू केली. परफेक्ट साऊंडमुळे मंगलमुर्ती साऊंडवाला हवाच या हट्टाने वधु-वरांच्या मनातही दादासाहेब यांनी घर निर्माण केले.

महाराष्ट्रभर मंगलमुर्ती साऊंड आपले स्वत:च्या बनावटीचे युनिट देत असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन

आज डिजेच्या दोन गाड्या दररोज चालतात ज्यामुळे सहा जणांना रोजगार मिळाला. त्यांचा हा कारभार मिञ आणि सहकाऱ्यांच्या भरवशावरच कायम आहे.याशिवाय महाराष्ट्रभर मंगलमुर्ती साऊंड आपले स्वत:च्या बनावटीचे युनिट देत असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात दादासाहेब मगर यांना यश प्राप्त झाले आहे. दवळपास पंचविस वर्षांचा त्यांचा हा संघर्ष आता फळाला आला आहे.

व्यवसायात परवडत नाही अस बोलणाऱ्यांना या तरूणाच हे ऊदाहरण म्हणजे सणसणीत चपराक


महाराष्ट्रातील विवीध काना-कोपऱ्यात गाव-खेड्यात मंगलमुर्तीचा आवाज पोहचतो आहे.यामुळे दादासाहेब मगर हा आपल्या गावचा नवतरूण एवढी क्रांती करेन असे कुणालाच वाटले नसावे.आज हाताला काम नाही,काय काम कराव,व्यवसायात परवडत नाही अस बोलणाऱ्यांना या तरूणाच हे ऊदाहरण म्हणजे सणसणीत चपराक होय !

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.