नगरविकास विभाग आणि गृहविभागाच्या पुरवणी मागणीत आमदारांनी काय मागितले?
(What did the MLAs demand in the supplementary demand of the Urban Development Department and the Home Department?)
नगरपालिकेसाठी जलशुद्धीकरण,तलाव,नविन इमारत तर गृहविभागाकडून चार पोलिस ठाण्यासाठी इमारती आणि वैजापूरसाठी कर्मचारी
वैजापूर नगरपालिकेकरीता नव्याने जल शुद्धिकरण प्रकल्प करावा
(A new water purification project should be done for Vaijapur Municipality.)
वैजापूर हे शहर महत्वपुर्ण ठीकाण असून नगरपालिका आणि तालुक्याच गांव असल्याच आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी पुरवणी मागणीत म्हटले आहे. 42000 लोकसंख्येच हे शहर असून गेल्या अडीच वर्षांपासून जलशुद्धीकरण प्रकल्प- पाणी फिल्टर प्रकल्प बंद असल्याच गाऱ्हाण मांडत सरकारला विनंती करत वैजापूर नगरपालिकेकरीता नव्याने जल शुद्धिकरण प्रकल्प करावा अशी पहिली मागणी आमदार बोरनारे यांनी केली आहे.

नांदूर मधमेश्वर कालव्याच्या अंतर्गत जल साठवण तलाव
(Water storage tank under Nandur Madhameshwar Canal)
गोदावरी नदीच पाणी जिथे पोहचते त्या गोयगांवच्या जल साठवण तलावाचे कॉंक्रेटीकरण कराव असेही ते म्हटले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या अंतर्गत जल साठवण तलाव ऊभारल्यास वैजापूरकरांच्या पिण्याच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल अशी मागणी केली आहे.
नगरपालिकेच्या इमारतीत प्रत्येक विभाग वेगवेगळ्या ठीकाणी आहे त्यामुळे नागरीकांची हेळसांड होते.याकरीता नगपालिकेस प्रशासकीय इमारत सरकारच्या माध्यमातून देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी केली आहे.
पंधरावा वित्त आयोगाचा निधी खाजगी गुत्तेदाराला न देता स्वच्छता कर्मचारी नेमल्यास स्वच्छतेचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरळीत चालेल.म्हणून पालिका स्तरावर स्वच्छता कर्मचारी नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.
स्वच्छेतेकडे वेधले लक्ष
वैजापूर पोलिस ठाण्यास शहर आणि ग्रामीण मिळून एकच पोलिस ठाणे असल्याची बाब आमदार बोरनारे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून देत शहर आणि ग्रामीण दोन्ही मिळून एकच पोलिस ठाणे असल्याने 54 गावांची मोठी हेळसांड होतेे. याकरीता
वैजापूर शहरासाठी आणि ग्रामीणसाठी स्वतंञ पोलिस ठाणे करण्यात यांव असेही ते म्हणाले.वैजापूर ग्रामीणच्या 54 गावच पोलिस ठाणे वेगवेगळे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
चारही पोलिस ठाण्यांची अवस्था बदलण्यासाठी नविन इमारती द्याव्यात
(New buildings should be provided to change the condition of all four police stations.)
मतदारसंघात चार पोलिस ठाणे चारही पोलिस ठाण्यांची अवस्था बदलण्यासाठी नविन इमारती द्याव्यात अशी मागणी केली आहे.ज्यात प्रामुख्याने शिऊर,विरगांव,शिल्लेगांव आणि वैजापूर या चार पोलिस ठाण्यांचा सहभाग आहे.तर यात मुख्यत: वैजापूर पोलिस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आलेली आहे.ही इमारत कधी खाली कोसळेल सांगता येत नाही त्यामुळे अतितात्काळ या मुद्द्यावर गृहविभागाने चारही पोलिस ठाण्यांच्या इमारती नव्याने मंजूर कराव्यात अशी मागणी आमदार प्रा बोरनारे यांनी केली आहे.

याशिवाय वैजापूर पोलिस ठाण्यात वैजापूरचा कारभार पहाण्यासाठी अतिशय कर्मचारी कमी असल्याने वैजापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी असेही बोरनारे यांनी सांगत कर्मचारी वाढविण्याची मागणी केली आहे. यांसह अन्य महत्वपुर्ण मुद्दे नगरविभाग व गृहविभागाच्या अंतर्गत असलेल्या विशेष पुरवणी मागणीत आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी मांडले आहेत.
- Kannad Fedration Election : आमदार संजना जाधव यांनी या निवडणूकीत पंधराच्या पंधरा जागा जिंकल्याकन्नड/छञपतिसंभाजीनगर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, (Kannad) कन्नडच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार संजना जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवशाही शेतकरी विकास पॅनल’ने सर्व जागा जिंकल्या. या निवडणुकीत संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या विरोधात तालुक्यातील विरोधकांनी एकजूट करत जोर लावला होता. माजी आमदार नितीन पाटील, नामदेव पवार, किशोर पाटील, उदयसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, केतन… Read more: Kannad Fedration Election : आमदार संजना जाधव यांनी या निवडणूकीत पंधराच्या पंधरा जागा जिंकल्या
- Dishonoured cheque धनादेश अनादरण आरोपीस सत्तर हजार नुकसान भरपाईचे आदेशधनादेश अनादरण: आरोपीस70,000/- हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश व रक्कम न भरल्यास एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा.वैजापूर: येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस रूपये 70,000/- हजार रुपये नुकसाभरपाई फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापुर लां द्यावी व रक्कम नाही… Read more: Dishonoured cheque धनादेश अनादरण आरोपीस सत्तर हजार नुकसान भरपाईचे आदेश
- त्या घटनेतील हल्लेखोर सीसीटिव्हीत कैददोन दिवसांपूर्वी संभाजीनगर च्या वैजापुर तालुक्यातील चिंचडगावात कीर्तनकार महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या आश्रमात शिरून ह. भ. प. संगीताताई महाराज पवार यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येच्या मध्यरात्रीस चोरट्यांचा एक चोरीचा प्रयत्न करतानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आला आहे. तर आश्रमातून दोन दानपेट्या चोरीला गेल्या होत्या, त्यामुळे… Read more: त्या घटनेतील हल्लेखोर सीसीटिव्हीत कैद
- Inside Story Of Three Murder-तीन आठवडे,तीन खून,दोन महिला एक तरूण,मुकले जीवालाजून महिना जुन्या वादांचा दी एंड करणारा महीना ठरला. तीन आठवडे तीन खून अशी ही मालीका. तालुक्यात तीन घटना हादरून टाकणाऱ्या घडल्या. एका तरुणासह महिलेच्या खुनानंतर आता समाज प्रबोधन करणाऱ्या महीला कीर्तनकाराचीही डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. या घटनांमुळे तालुक्यातील वातावरण ढवळून तर निघालेच. परंतु या पाठोपाठ घडलेल्या घटनांनी समाजमन सुन्न झाले. या घटनांमुळे… Read more: Inside Story Of Three Murder-तीन आठवडे,तीन खून,दोन महिला एक तरूण,मुकले जीवाला
- Vaijapur Murder News समाज प्रबोधनकार संगिताताई महाराज यांची डोक्यात दगड घालून हत्यासमाज प्रबोधनकार संगिताताई अण्णासाहेब पवार(महाराज )यांची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना मध्यराञीच्या सुमारास घडली आहे. छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचडगांव येथील समाज प्रबोधनकार कीर्तनकार असलेल्या संगिताताई महाराज यांची ‘मोहटादेवी आश्रमात’ डोक्यात दगड घालून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही. मध्यराञीच्या सुमारास ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनास्थळी पोलिस यंञणा दाखल… Read more: Vaijapur Murder News समाज प्रबोधनकार संगिताताई महाराज यांची डोक्यात दगड घालून हत्या