आत्महत्या ग्रस्त कुटूंबीयांच्या भेटीला खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरणारे
वजनापुर ता.गंगापुर येथील ३२ वर्षीय शेतकरी युवकाने कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि.२४ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
बालचद कडू कांबळे वय ३२ राहणार वजनापुर वडाळी रस्त्यावरील कांबळे शेतवस्ती ता.गंगापूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहेत.
दरम्यान शुक्रवार दिनांक 27 / 6 / 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर चे खासदार संदीपानजी भुमरे , आमदार प्रा. रमेश बोरणारे शिवसेना तालुका प्रमुख दिलीप निरफळ , लासूर बाजार समिती उपसभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख अनिल पाटील चव्हाण, शेतकरी नेते तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव , संचालक अप्पासाहेब जगदाळे , सरपंच शिवम जाधव , चेअरमन मन्सूब चव्हाण ,
मयत शेतकऱ्यांच्या पच्छात आई , वडील , भाऊ व्हॉइस चेअरमन दशरथ कांबळे व एक बहीण , पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

प्राप्त माहितीनुसार या शेतकरी युवकाने सततची नापीकी व पिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीतील अनुदान मिळत नसल्याने बँकेकडून मिळणाऱ्या पीककर्जाच्या जाचक अटीमुळे या युवक शेतकऱ्यांने नैराश्यापोटी टोकाची भूमिका घेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान या शेतकऱ्याकडे चार पाच एकर कोरडवाहू शेती आहे त्याने वस्तीवरील राहत्या घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून टोकाचे पाऊल घेऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान खासदार संदीपानजी भुमरे व आमदार रमेश बोरनारे यांनी मयत कुटुंबीयास शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली, आणि शेतकऱ्यांनी खचून न जाता असे टोकचे पाऊल उचलू नये सरकार सर्व बाजूनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे सांगितले.