छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Appointment News: अनिल सोनवणे यांच्याकडे शिक्षक सेनेची महत्वाची जबाबदारी

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी अनिल सोनवणे यांची निवड….

संतोष गंगवाल

देवगांव रं/छञपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी देवगाव रंगारी येथील शिक्षक अनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली.


संघटनेच्या बैठकीत संघटनेचे राज्यसरचिटणीस दीपक पवार, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ जगदाळे , राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश लबडे ,राज्य सल्लागार एल टी ठुबे , जिल्हा संपर्कप्रमुख कल्याण पवार , जिल्हाध्यक्ष अमोल एरंडे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत अनिल सोनवणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रसंगी संजय जोशी ,उद्धव बोचरे, गजानन नेहाले यांची देखील विविध पदावर निवड करण्यात आली. सदरील कार्यक्रमाला जिल्हास्तरावरील संदीप चव्हाण ,काशिनाथ वसईकर , नितीन आसने ,भगवान हिवाळे ,ज्ञानेश्वर भागवत यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीबद्दल शिवसेना पक्षाचे प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे , कन्नड तालुक्याच्या आमदार सौ.संजनाताई जाधव यांच्यासह शिक्षकवृदांनी अभिनंदन केले आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.