गंगागिरीजी महाराज यांचा178 व्या अखंड हरिनाम सप्ताहसाठी गोदावरी नदीकाठाजवळ जागा पाहणी
गोदावरी नदीकाठाजवळ निसर्गरम्य वातावरणात होणार वारकऱ्यांचा महाकुंभ
आशिया खंडातील सर्वात मोठा गिनीज बुक ऑफ इंडिया नोंद असलेला 178 व्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह गोदावरीच्या तीरावर असलेल्या शनिदेवगाव ,चेडुफळ बाजाठाण,हमरापूर,अव्वलगाव,भामाठाण ,कमलपुर पंचक्रोशीत करण्याचे नियोजन आहे त्यासाठी दिनांक 15 मार्च रोजी महंत रामगिरीजी महाराज यांच्या समवेत भक्तमंडळाने स्थळ पाहणी केली .
याविषयी सविस्तर वृत्त असे की वारकऱ्यांचा महा कुंभ समजला जाणारा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ इंडियाने घेतले आहे लाखो वारकरी या महा कुंभासाठी हजर असतात रात्रंदिवस भजन कीर्तन सत्संग असे विविध कार्यक्रम पार पडतात .

या सप्ताहाचे प्रमुख 10 हजार टाळकरी एकाच वेळी भजन करतात दररोज 150 ते 200 गावातुन भाकरी आणुन दररोज लाखो भाविकाना आमटी भाकरीचा महाप्रसाद दिला जातो.
हा सप्ताह आमच्याच परिसरात व्हावा यासाठी अनेक भाविकांची मागणी असते या वर्षी गंगथडीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविकांची अनेक वर्षापासून मागणी होती.

महंत रामगिरीजी महाराज यांचाही वास्तव्य या परिसरात आशुतोष महाराज मंदिर परिसरातील आश्रमात 14 वर्षे राहिले आहे त्यामुळे आम्हाला सप्ताह मिळावा ही आग्रही मागणी असल्याने मंहत रामगिरीजी महाराज यांनी दिनांक 15 मार्च रोजी शनिदेव गाव येथील शनि मंदिरापासून तर बाजाठाण येथील आशुतोष महादेव मंदिरापर्यंत हजारो एकर परिसर पाहणी केली.
गोदावरीच्या काठी विविध पुरातन मंदिरे असून याची स्थळ पाहणी करत, महाराजांनी सप्ताह याच परिसरात करण्याचे सकारात्मक संकेत दिले. दोन्ही गावातील मध्यवर्ती असलेले देवस्थान रामेश्वर महादेव मंदिर या परिसरात सप्ताहाचे मध्यवर्ती ठिकाण असेल याच परिसरात भजन कीर्तन मंडप उभारण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आले.

यावरून यावर्षीचा वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 178 वा अखंड हरिनाम सप्ताह याच पंचक्रोशीत होणार असे दिसते.
गंगागिरीजी महाराज परंपरेत सप्ताह निश्चिती पुणतांबा येथील किर्तनात सप्ताहाच्या पंधरा दिवस अगोदर एकादशीच्या दिवशी जाहीर करण्यात येते मात्र पूर्वतयारी म्हणून हे स्थळ पाहणी करण्यात आली असे महाराज म्हणाले.
महंत रामगिरीजी महाराज -मठाधिपती सराला बेट
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत रामदरबार आश्रमाचे मंहत हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे मंहत संदिपाण महाराज, सराला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज, योगानंद महाराज, आमदार प्रा. रमेश बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गंलाडे, यांच्यासह पंचक्रोशीत हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते