वैजापूरात शिंदेच्या शिवसेनेकडे वज्रास्ञ !
मा.आमदार भाऊसाहेब तात्यांच्या भुमिकेने वाढली आमदार रमेश बोरनारेंची ताकद .
सत्तानाट्य वेगवेगळ्या पद्धतीने आजवर महाराष्ट्राने अनुभवलय,परंतु आता हेच सत्ता नाट्य वैजापूरच्या पार्श्वभुमीवर सुरू आहे की काय अस वाटायला लागलय.
‘स्ट्रोक पे मास्टरस्ट्रोक’ असा सामना वैजापूरच्या राजकारणात रंगायला लागलाय.याच ऊदाहरण म्हणजे नुकतेच,एकनाथराव जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर लगेचच डॉ दिनेश परदेशी ,बाळासाहेब संचेती अविनाश गलांडेसह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला अन वैजापूरात भाजपची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली.
आता भाजपचा पहीला स्ट्रोक हा सौम्य होता परंतु दुसरा स्ट्रोक माञ जोर झटका ठरला.यावर शांत बसतील ते बोरनारे कसले स्थानिक कलगीतुऱ्यात असलेले परदेशी विरूद्ध बोरनारे हा सामना बुद्धी पातळीवर युद्धासारखा सुरू आहे.

आता यात विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेत वैजापूरच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर यांच्या प्रवेशाने राजकीय वलयात भुवया ऊंचवल्या आहेत.आमदार बोरनारेंच्या पुढाकारातून तात्यांचा प्रवेश आज होणार या चर्चेला ऊधान आल असली तरी हा बोरनारेंचा मास्टरस्ट्रोक असल्याचीही चर्चा आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी उबाठा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिंदेसेनेच्या गोटात जाऊन मिळाले होते. परंतु काही दिवस ‘विश्रांती’ घेत त्यांनी आता शिंदेसेनेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज १८ मार्च रोजी चिकटगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा प्रवेश होणार आहे.
दादांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती
यापुर्वी तात्या दादांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती,माञ तल्लखबुद्धीच्या तात्यांनी यांवर माध्यमप्रतिनीधींना सखोल खुलासा केला नाही.कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी सरांना केलेली मदत म्हणजे भविष्यात तात्या शिंदेसेनेतच जातील यावर शिक्कामोर्तब करत होती.
डॉ. परदेशींच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होताच चिकटगावकरांनी उबाठाला जय महाराष्ट्र केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी वैजापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आवई उठल्यानंतर चिकटगावकर ‘अलर्ट’ होऊन त्यांनी पक्षनेत्यांशी ‘अबोला’ धरून पक्षीय कार्यक्रमास ‘दांडी’ मारणे सुरू केले. त्यानंतर काही दिवसांनी झालेही तसेच. डॉ. परदेशींच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होताच चिकटगावकरांनी उबाठाला जय महाराष्ट्र केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी वैजापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आवई उठल्यानंतर चिकटगावकर ‘अलर्ट’ होऊन त्यांनी पक्षनेत्यांशी ‘अबोला’ धरून पक्षीय कार्यक्रमास ‘दांडी’ मारणे सुरू केले. त्यानंतर काही दिवसांनी झालेही तसेच. डॉ. परदेशींच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होताच चिकटगावकरांनी उबाठाला जय महाराष्ट्र केला.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चिकटगावकरांनी शिंदेहसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या तंबूत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान विधानसभा निवडणुकीत त्यांनी बोरनारेंसोबत काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसत असले तरी राजकारणात फारशी सक्रियता नव्हती. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांचा १८ मार्च रोजी दुपारी मुंबई येथे समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे हेही उपस्थित राहणार आहेत.