छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र बोलका दणका रोखठोख

गावच्या विकासाचे मॉडेल उभी करणारी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची “कुरण”, “व्हाईट कॉलर “वाल्यांचा झोल-झाल

 गावाच्या विकासाचे “मॉडेल” उभी करणारी संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे बघितले जाते. मात्र तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायत सद्या भ्रष्टाचाराची “कुरण” बनते व कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो अन् कुणालाच भनक नसते
असा धक्कादायक प्रकार वीरगाव ग्रामपंचायत मध्ये काही दिवसांपूर्वी उघडकिस आला आहे. त्यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी कोट्यवधींचा अपहार करणारी “व्हाईट कॉलर ” मोकाट गॅंग अजूनही मोकाट फिरत आहे. तर दोन महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या चौकशी समितीला पंधरा दिवसांचा अहवाल सादर करण्याचे आदेश असताना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरी देखील समितीने कुठलाही अहवाल वरिष्ठांना सादर केलेला नाही त्यामूळे भ्रष्टाचार करणाऱ्यांपेक्षा त्यांना वाचणारे देखील दोशी असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून प्रतिक्रीया उमटताना पाहायला मिळत आहे.


तालुक्यातील वीरगाव- मुर्शदपूर ग्रामपंचायतीमध्ये मागिल दहा वर्षांत तेरा वित्त आयोग, चौदा वित्त आयोग, पंधरा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा, दलित वस्ती, रोजगार हमी योजना यासह इतर योजनेमधील बँक खात्यातून बेरर चेक काढल्यासह
इतर तेरा मुद्द्यांवर आरोप करत समजा सेवा मंचाच्या वतीने जवळपास तीन वर्षांपासून तक्रार करून पाठपुरावा सुरू आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मागील साडेतीन वर्षात विविध चौकशी समित्यांनी चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर देखील केला होता. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालीन
गटविकास अधिकारी यांना दिले होते.

त्यामूळे तीन महिन्यांपूर्वी वैजापूर पंचायत समितीत नव्याने गटविकास पदाचा पदभार
डॉ.श्रीकृष्ण वेणीकर यांनी स्वीकारताच सहा सदस्य असणारी समिती स्थापन केली होती. त्यात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची यात नियुक्ती करण्यात आली होती. तसेच या समितीचे अध्यक्षपदाचे सूत्र सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भगत यांच्याकडे देण्यात आले होते. व त्यांच्या नेतृत्वात समितीला पंधरा दिवसात तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे तरी देखील समितीने आपला अहवाल सादर केला नसल्याने नागरिकांकडून चौकशी समितीवर
संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गैरव्यवहार करणारे भामटे राजकीय राजकीय वरदहस्त वापरत असल्याचा दावा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामूळे साडेतीन वर्षांपासून लालफितीत अडकणारी चौकशी आता पुढील आठवड्यात तरी पूर्ण होणार आहे का ? असा प्रश्न या उपस्थित होत आहे.

———

थेट सवाल

अक्षय भगत सहाय्यक गटविकास अधिकारी तथा चौकशी समिती अध्यक्ष..

चौकशीचे सद्या काय स्थिती आहे?

उत्तर: अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला आहे. पुरवणी अहवाल सोमवार पर्यंत सादर करणार आहोत.

चौकशीसाठी एवढा विलंब का केला जात आहे?

उत्तर: सर्वाधिक काम हे लेखापरीक्षणाचे असल्याने त्या संबंधित विभागाचे अधिकारी निवडणुकीत कामात व्यस्त असल्यामुळे विलंब झाला.

* तुमच्यावर काही राजकीय दबाव आहे?

उत्तर: मुळीच नाही

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.