व्यसन नसले तरी कॅन्सर..चरबीयुक्त
आहार, गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कोणतेही व्यसन नसताना दीर्घ कालावधीच्या अॅसिडीटीमुळेही हा आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. विशेष म्हणजे, या कॅन्सरमध्ये अन्ननलिका दोन ते तीन सेंटीमीटरपर्यंत अरुंद झाली, तरी विशेष असा त्रास जाणवत नाही.
याकडे दुर्लक्ष होऊन तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातच या आजाराचे निदान होते. साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, वेळीच काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
४० ते ५० वयोगटात रेक्टम कॅन्सरची लक्षणेकॅन्सरचे प्रकार किती?
दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आहेत. मुख्यत्वे आढळणारे गर्भाशय, स्तन, अन्ननलिका, मूख, अडजिभेचा, रक्ताचा कॅन्सर आहेत.

आनुवंशिकता हेही कारण :
ज्यांना कोणतंही व्यसन नसतं, त्यांनाही आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. याचं कारण म्हणजे आनुवंशिकता, पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीतील बदल.
५० वर्षे ते ६० च्या वयोगटात आतड्यात होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. याला कोलन कॅन्सर म्हणतात.
पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब :
बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अधिक सेवन, व्यसन, व्यायामाचा अभाव व ताणतणावामुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
विशेषतः साखर आणि मांसाहार
अमर्यादित होत असल्याने पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब होत असल्याचे दिसून येत आहे. भारतात मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागातला म्हणजे गुदद्वाराचा कॅन्सर तरुणांमध्ये सर्वाधिक आढळून येतो.
आतड्याचा कॅन्सर झाला कसे ओळखणार? अशी आहेत लक्षणे
पचनामध्ये समस्या असल्यास, जसे की वारंवार बद्धकोष्ठता किंवा वारंवार मलविसर्जन, मलमध्ये रक्त असल्यास किंवा त्याचा रंग काळा असल्यास, वारंवार पोटात दुखणे. वजन कमी होणे.
थकवा जाणवणे. अती दारू पिल्याचा असाही परिणाम, अती दारू पिणं हे आतड्याच्या कॅन्सरचं एक मोठं कारण आहे. दारूमुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि पेशींची वाढ अनियंत्रित होते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
भारतात ४० ते ५० वयोगटात ‘रेक्टम’, म्हणजे गुदाशयात होणारा कर्करोग हा सर्वांत सामान्य आहे. या शिवाय, ५० ते ६० वयोगटात कोलन कॅन्सर हा मोठ्या आतड्यात होणारा कर्करोग दिसून येतो.
डॉ. नितीन चाटे, सर्जरी विभाग प्रमुख,