ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Kannad News: देवगाव रंगारी येथे संत तुकाराम महाराज बीज,तीन दिवस धार्मिक कार्यक्रम

देवगांव रं/छञपती संभाजीनगर

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त देवगांव रंगारी येथे तीन दिवसीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमीत्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाची सुरुवात शनिवारी (ता १५) होणार आहे.


येथील पंचमीचा ओटा परिसरातील विठ्ठल मंदिरात होत असलेल्या या कार्यक्रमात पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात ते आठ विष्णु सहस्त्रनाम, नऊ ते बारा तुकाराम महाराज गाथा भजन, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ, संध्याकाळी सात ते नऊ हरिकिर्तन होणार आहे .

शनिवारी (ता १४) प्रभाकर महाराज चन्ने, रविवारी (ता १६) कृष्णा महाराज शास्त्री गायकवाड यांचे किर्तन होणार आहे.सोमवारी (ता १७)सकाळी आठ ते दहा संत तुकाराम महाराज पालखी मिरवणूक निघणार आहे तर दहा ते बारा रामदास महाराज पवार यांचे किर्तन होवुन महाप्रसाद वाटपाचे सप्ताहाची सांगता होणार आहे.

यावेळी गावातील व परिसरातील संत महंतांची कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार आहे.भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.