मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासन करणार
सोमनाथ पवार
कन्नड तालुक्यातील सातकुंड , बेलखेडा येथील सहा मजुरांचे अपघाती निधन झाले . यात आठ मजूर जखमी झाले. या घटनेबाबत सातकुंड व बेलखेडा येथे मृदा व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट ,खासदार संदिपान भुमरे , जिल्हाधिकारी श्री.स्वामी, पोलीस ग्रामीण अधिक्षक श्री.राठोड

आमदार संजनाताई जाधव यांनी जाऊन मजुरांच्या दुःखद घटनेबाबत संबंधित पीडित कुटुंबास भेट दिली. तातडीने शासकीय मदत प्रति व्यक्ती ५ लाख रुपये मदत केली. तसेच पीडित कुटुंबामधील लहान मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे.

त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुगृह अनुदान योजने मार्फत प्रत्येकी ५० हजार रुपये अशी मदत मिळून देणार आहे.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तथा सर्व प्रमुख शासकीय पदाधिकारी व सर्व पदाधिकारी शिवसेना व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपथित होते.

या दुःखद घटनेप्रसंगी आम्ही सर्वजण कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि अजून आवश्यक ती मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास पीडित कुटुंबीयांना दिला.