होळी म्हणजे वाईट विचाराचे दहन ! महंत रामगिरी महाराज.
गोदावरी धाम येथे पारंपारिक पद्धतीने होलीका साजरी
होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे.
या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट येथे आज होलिका प्रज्वलित करण्यात आली याप्रसंगी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरीजी महाराज पुढे म्हणाले की आज समाजामध्ये खूप खूप रथा अनिष्ट रूढी परंपरा चालू आहे आजही अनेक दृष्ट राक्षस आपल्या समाजामध्ये वावरताना दिसत आहे या प्रवृत्तींना आजच्या दिवशी नष्ट करून त्याची होळी करावी नवीन संकल्प करावेत.

होळीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणाले की आपल्या पूर्वजांनी ज्या सण उत्सव परंपरा सुरू केल्या ते आपल्या जीवनात किती आवश्यक आहे याचे महत्त्व स्पष्ट केले अनेक वनस्पती वृक्ष या होळीच्या मध्ये जाळल्याने वातावरणाची शुद्धी होते.
परंतु या परंपरेमध्ये आपण योग्य वेळी योग्य बदल ही करायला पाहिजे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने आपण होळीकेमधील लाकडं न जाळता, अनिष्ट रूढी परंपरा कृपया याचे दहन केले पाहिजे शेणाच्या गौर्या वाळलेला पालापाचोळा वनस्पती याची होळी करावी. याप्रंसगी सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्यासह बेटाचे विद्यार्थी उपस्थिती होते