छञपती संभाजीनगरच्या ,वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथे रास्ता रोको….!
स्व. संतोष देशमुख यांना अतिशय क्रूर पणे मारहाण करत वाल्मीक कराडांच्या गुंडांनी देशमुख आतिषय क्रुरपणे हत्या केली याचा निषेध म्हणून वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे रास्ता रोको बुधवार ता 12 मार्च रोजी संभाजिनगर मालेगाव महामार्गावर करण्यात आला.
यावेळी हिंदवी जन क्रांती सेनेचे आजय पाटिल साळुंके यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी अजय पाटील साळुंके बालतांना म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुंडाना साथ देणारांवर गुन्हे दाखल करा देशमुखाना न्याय द्या धनंजय मुंढे वाल्मीक कराड यांना सह आरोपी करुन त्यांच्या गुंडांना फाशी द्या आशा गुंड प्रवृतिचा बंदोबस्त करावा तसेच आरोपींना वाचवण्यासाठी आंदोलन मोर्चे व सोशल मीडियावर समर्थन करु दहशत निर्माण करतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे असे हिंदवी जन क्रांती सेनेचे अध्यक्ष आंदोलनकर्ते अजय यांनी दिली आहे.

गुंड प्रवृत्तिला प्रोत्साहन साळुंके यांनी निवेदनात म्हटले आहे. यासाठी दिल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी धनंजय मुंडेंची देखील या प्रकरणात व देशमुख यांना न्याय द्यावा धनंजय मुंढेचीआमदारकी रद्द करून हे प्रकरण फास्ट टॅग कोर्टात चालवुन तात्काळ प्रकरणं निकाली काढावे आशी मागणी अजय पाटिल साळुंके यांनी केली.
यावेळेस बाळा जाधव, डाॅ.अर्जुन साळुंके, अर्चना साळुंके, सोमनाथ मोरे, पंडीत साळुंके, संतोष गोरे ,दिपक साहणखोरे, संतोष भारती, एन डी पाटिल यांची भाषण झाली.
यावेळी पोलीस पाटिल रावसाहेब सोमासे यांनी रास्ता रोको संदर्भात महिती देऊन आनुचित प्रकार घडु नये म्हणुन शिऊर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळेस दोन किलोमिटर पर्यंत वाहणाच्या रांगा उभ्या होत्या.