धारणखेड्यात रंगणार संगितमय ‘शिवमहापुराण कथा’
दररोज महाप्रसाद,अध्यात्मिक कार्यक्रम,काल्याच्या कीर्तनात होणार भाविकांचा सन्मान
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेञ लामनगांव येथील धारणखेडा येथे चैतन्य कानिफनाथांची स्वयंभू मुर्ती असल्याने हे तिर्थक्षेञ भाविकांसाठी मढी तीर्थक्षेञासमान मानले जाते.
शिवना नदीच्या तीरावर वसलेले हे तीर्थक्षेञ
शिवना नदीच्या तीरावर वसलेले हे तीर्थक्षेञ भाविकांसाठी वरदान ठरत असून प्रत्येक वर्षी रंगपंचमीनिमीत्त वेगवेगळे महायाग व संगितमय कथेचे आयोजन आणि हजारो भाविकांसाठी सात दिवस अन्नछञ सुरू असल्याचे आश्रमाचे मठाधिपती महंत श्री नारायणानंदजी सरस्वती महाराजांनी सांगितले.

संगितमय शिवमहापुराण कथेचे आयोजन
यावर्षी रंगपंचमी याञे निमीत्त ता 16 मार्चपासून येथे विष्णू महायाग सोहळा साजरा होत आहे.यानिमीत्त दररोज संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत महंत नारायणानंदजी सरस्वति महाराजांच्या अमृतवाणीतून संगितमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नामांकीत अनेक साधुसंत दररोज भेट देणार
पहाटे काकडा भजन,सकाळी विष्णुसहस्ञनाम ,दुपारी महायाग,दुपारी दोन ते चार नवनाथ पारायण,सायंकाळी हरीपाठ ,शिवमहापुराण कथा व त्यानंतर दररोज राञी हरीजागर होणार आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नामांकीत अनेक साधुसंत दररोज भेट देणार आहे.
रविवार ता 23 मार्चला सांगता होणार
रविवार ता 23 मार्चला सांगता होणार आहे.महंत नारायणानंदजी सरस्वतींच्या अमृतवाणीतून सकाळी काल्याचे कीर्तन व त्यानंतर भाविकांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.भव्य महाप्रसाद आयोजित केला आहे.