विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन-2025
,
वैजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बोरनारेंचे अर्थमंञ्यांना साकडे
छञपती संभाजीनगर जिल्ह्यासह वैजापूर तालुक्यातील अनेक शाळांच्या खोल्या पडक्या तर काही ठीकाणी पञ्याच्या खोल्या आहेत.नविन इमारत बांधकाम करण्यासाठी निधीची मागणी केली आहे.

नुकतेच रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी झालेली असताना आमदार प्रा रमेश बोरनारे हे आत्तापासूनच सदरील योजना सुरू करण्याच्या तयारीला लागले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी नदीजोड प्रकल्पाआधारे रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी अर्थमंञ्यांकडे मागणी केली आहे.यासोबतच मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी आणि चांदेश्वरी प्रकल्पासाठी निधीची मागणी आमदार बोरनारे यांनी केली आहे.
आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणात आमदार बोरनारे म्हणाले की,मी शेतकऱ्याच पोरग म्हणून सांगतो, मतदारसंघात मी गावो-गावी फीरतो शेतकरी भेटतात तेव्हा ते मला विचारतात की,कर्जमाफी कधी होईल तर सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी पुरवणीच्या माध्यमातून प्रयत्न करावा असा प्रस्ताव आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी मांडला.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती,लाडक्या बहिणी या निधीत वाढ होण्याची वाट पहात आहे. तीन भाऊ मिळून ही जबाबदारी पार पाडावी असेही बोरनारे म्हणाले.
वैजापूरच्या रोजगार निर्मातीसाठी नविन एमआयडीसी सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीतीस मदत होईल.
कापूस ऊत्पादनासाठी बारा जिनींग प्रेसींग आहे,एक सुतगिरणी देण्याची विनंतीपुर्वक मागणी आमदार बोरनारेंनी केली.यासोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार गुत्तेदारांमार्फत न देता थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात यावा व ग्रामविद्यूत व्यवस्थापकास मासिक वेतन पंधरा हजार रुपये देण्याचीही मागणी केली.
ग्रामीण भागात घरकूलासाठी 1 लाख 58 हजार रु निधी मिळतो यात आता सरकारकडून 50 हजारांची वाढ केली आहे ,परंतु शहराच्या तुलनेत ग्रामीणला मिळणारा घरकूलसाठीचा निधी कमी असल्याचे सांगत शहरातील घरकूल सम तुलनेत ग्रामीणच्या घरकूलास निधी देण्याची मागणी आमदार बोरनारे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.