छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Person

Army Selection: दात खाऊन भिडला अन शेवटच्या प्रयत्नात बनला,गावचा पहीला फौजी

आईच्या आधारावर तो बनला खिर्डी हरगोविंदपूर गावचा पहीला फौजी

ही शेवटचीच भरती म्हणून “दात खाऊन भिडलो”-भगवान काळे

युग बदलत चाललय तस भौतिकवादही वाढत चालला आहे.परंतु याच भौतिकवादात ध्येय भरकटताना अनेक नवयुवक बरबाद पिढीकडे वाटचाल करताना पहायला मिळतात. छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिर्डी(हरगोविंदपूर) वैजापूर गावचा भगवान काळे हा युवक भौतिकवादास अपवाद ठरला आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो लासूरच्या संकल्पपुर्ती या खाजगी पोलिस,सैन्य भरतीपुर्व परीक्षेचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत तो प्रा राजू शेळकेंच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत होता. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर आता यश मिळवणे खुप कठीण असल्याच त्याला वाटायला लागल अन तो काही अंशी खचला परंतु सराव सुरूच होता.

ही शेवटचीच भरती अस ठरविल अन दात खाऊन भिडलो

बिंदासने घेतलेल्या मुलाखतीत भगवानने यशाचा कानमंञ सांगताना अनेक महत्वपुर्ण गोष्टींचा ऊल्लेख केला आहे.भगवानच्या मते यश हे एकदम नाही परंतु सातत्याने एक दिवस नक्की मिळत त्यामुळे प्रयत्नास सातत्याची जोड दिली पाहीजे असे भगवान म्हणतो. आईच्या मतदीसाठी भगवानने शेतीतील प्रमुख कामे,मोल-मजुरीच्या कामांमध्ये मदत केली आहे.त्यामुळे कष्टांची जाण ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत भगवान गावचा पहीला फौजी बनला आहे.

वडीलांचे छञ हरविले आईने लाड पुरविले

भगवान हा बालवयात असतानाच वडीलांचे आकस्मिक निधन झाले.यानंतर भगवानसह त्याच्या भावाच्या पालन-पोषणाची जबाबदारी भगवानच्या आईवर आली.फुलाप्रमाने या दोन मुलांना घेऊन मोलमजुरी केली.दुष्काळाच्या दाहकतेतही कष्टाची साऊली या माऊलीने मुलांवर धरली. शेतीकामे,रोजनदारीचे कामे करून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या.बिंदासला दिलेल्या मुलाखतीत भगवानच्या आईने मुलाच्या कर्तत्वाबद्दल झालेल्या कौतुकाचा आनंद व्यक्त केला आहे.

संकल्पपुर्ती ठरली गरजूंच्या शासकीय नोकरीचा आधार
लासूर स्टेशन स्थित असलेल्या संकल्पपुर्ती चे जिल्हाभरात चांगलेच नांव झाले आहे.अगदीच स्वप्नातही कधी स्वप्न न पाहीलेल्या कुटूंबांच्या डोळ्यातील खऱ्या आनंदाश्रुंचा मार्ग संकल्पपुर्तीच्या माध्यमातून खुला झाला आहे. आई-वडील जबाबदारीने मुला-मुलींना या संस्थेत प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवितात मुल परत येतात ते आई-वडीलांच्या मनातील संकल्प पुर्ण करूनच !

भगवानला मी लहानपणापासून ओळखतो तो आमचा भाऊच आहे.कष्ट जिद्द आणि थोडक्यात मिळालेल्या यशाला हुरळून जायचे नाही असे मी नेहमी भगवानला सांगायचो आज त्यान मोठ यश प्राप्त केल आहे.

-गणेश काळे (समाजसेवक,भाऊ)

संकल्पपुर्तीच्या माध्यमातून कल्पनेत नसलेले मुल आम्ही घडवीतो,अगदी प्रत्येक लहानातील-लहान आणि मोठ्यातील मोठी गोष्ट आम्ही कटाक्षाने विद्यार्थ्यांकडून पुर्ण करून घेतो.आम्ही गरीबीतून आलोय त्यामुळे गरीबांच्या लेकरांची आम्हाला जाण आहे.मेहनतीतून प्रत्येकाच्या आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अलगद निघणारे आनंदाश्रू हीच आमच्या कामाची पावती.

प्रा राजू शेळके
संस्थापक -संकल्पपुर्ती

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.