महाराष्ट्राला काळींबा फासणारे कृत्य बीड जिल्हातील मस्साजोग या गावी घडले आहे.
स्व. संतोष भाऊ देशमुख यांना अतिशय क्रूर पणे मारहाण करत कराडच्या गुंडांनी कायमचे संपविले. याचा निषेध म्हणून वैजापूर तालुक्यातील लोणी खु या गावात कडकडीत बंद व रास्ता रोको बुधवार ता 12 मार्च रोजी दुपारी चार वाजता महामार्गावर करण्यात येणार आहे.
वाल्मीक कराड व त्याच्या गुंडांना शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याकरीता हा रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती अजय पाटील साळुंके यांनी दिली आहे.
गुंड प्रवृत्तिला प्रोत्साहन दिल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे. यामुळे धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात सह आरोपी करून त्यांची आमदारकी रद्द करावी व फास्ट टॅग कोर्टात हे प्रकरण चालवुन तात्काळ प्रकरणं निकाली काढावे असे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
बीड जिल्हात वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांचे समर्थक समाजमाध्यमांवर तसेच प्रत्यक्ष दहशितीचे वातावरण निर्माण करत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी म्हटले आहे.

गुंड प्रवृतिचा बंदोबस्त करावा तसेच आरोपीना वाचवण्यासाठी आंदोलन मोर्चे व सोसियल मिडीयावर समर्थन करतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे असे आंदोलनकर्ते अजय साळुंके यांनी निवेदनात म्हटले आहे.
यासाठी या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी व देशमुख यांना न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
अजय साळुंके (अध्यक्ष व जनक्रांति सेना), अर्चना साळुंके, सोमनाथ मोरे, पंडीत साळुंके, संतोष गोरे, दिपक साहणखोरे, संतोष भारती, किशोर कुंदे, रामभाऊ शिंदे, अंकुश मगर, आकाश गोरे, संकेत बोर्डे, रविंद्र सोनवणे, नंदलाल निकम, कैलास पवार यांच्यासह इतरांच्या निवेदनावर सह्या आहे.