शिल्लेगाव, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे पाण्याचे टँकर सुरू करा अन्यथा पाणी प्रश्नावरती कायमस्वरूपी उपायोजना करा-कडूबाळ महाराजांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हे जिल्हा परिषद गटाील गांव आहे. ७४ खेड्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या निजामकालीन पोलीस स्टेशनचे व महाराष्ट्रातील प्रसिध्द असणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराने विशेष ओळख असणारे हे गाव आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर सुद्धा
५००० लोक संख्या असणाऱ्या या गावची पाण्याची समस्या सुटत नाही हे दुर्दैव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोट्यावधी रूपये खर्चुन महाराष्ट्र सरकारने मार्तंडी नदीवरील शिल्लेगांव मध्यम प्रकल्प निर्माण केला परंतु या धरणारत पाणीच नसल्यामुळे “धरण उशाला व कोरड घशाला” अशी अवस्था गावकऱ्यांची झाली आहे.
उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या झळा ईतक्या तीव्र झाल्या आहेत. की २०० लिटर ची पाण्याची टाकी ५० रूपयाला विकत घ्यावी लागते व काही वेळा तर विकत सुध्दा पाणी मिळतच नाही.
स्थानिक ग्राम पंचायतीने शासनस्तरावर टँकरचे प्रस्ताव पाठवून १ महिना उलटला यांवर काही कार्यवाही झालेली दिसत नसल्याने व आगामी काळामध्ये ग्रामस्थांचे पाण्यावाचुन हाल होऊ नये याकरीता ही बाब गांभीर्याणे घ्यावी असेही ते म्हटले आहे.
या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रामध्ये दि.२८ फेब्रुवारी २०२५ व दि.४ मार्च २०२५ रोजी बातम्या प्रकाशीत होवुन सुध्दा काहीच परिणाम झाला नाही.
शासनस्तरावर उपाय योजनेच्या हालचाली दिसुन आल्या नाही. करोता येत्या ८ दिवसात पाणी प्रश्न निकाली न निघाल्यास समस्त ग्रामस्थ व पाणी प्रश्नावरती गंभीर असलेले आम्ही नागरीक सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वा. राज्य मार्ग क्र. ३९ वरती लोकशाही मार्गाने “रस्ता रोको आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.