ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Bjp membership:  विनोद राजपूत यांनी केला हजाराचा टप्पा पार

वैजापूर/छञपती संभाजीनगर

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत संपुर्ण राज्यभरात सुरु असलेल्या प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानामध्ये वैजापूर शहरातील विनोद कैलाससिंग राजपूत यांनी एक हजार वैयक्तिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पुर्ण केले आहे.

त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपाच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी ९ मार्च रोजी राजपूत यांना अभिनंदनपर पत्र लिहित त्यांनी‌ देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात व भाजपच्या परिवारात एक हजार जणांना सामील करुन घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची मान जगभरात उंचावली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य थांबणार नाही.

भाजपचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत. यातुन आपली लोकांबाबत असलेली बांधिलकी व पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते.

या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणुन आपल्याला आदर व अभिमान वाटतो.‌ एक हजार सदस्य सोबत जोडुन आपण पक्ष संघटना बळकट केली आहे असे महसुल मंत्री बावनकुळे यांनी पत्रात म्हंटले आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.