छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Person बिंदास महाराष्ट्र

Politics Update: ‘न राहिले मशाल साथी, कमळ घेतले हाती ! अविनाश गलांडेंच ऑपरेशन जिल्हा परीषद

न राहिले मशाल साथी, कमळ घेतले हाती ! अविनाश गलांडेंच ऑपरेशन जिल्हा परीषद

छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे बहुचर्चित नेते अविनाश गलांडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत “आपली निशाणी धग-धगती मशाल” हे स्लोगण चांगलेच रंगविले होते. अगदीच सभेतील भाषणाच्या शेवटी त्यांनी आवर्जून उपस्थितींना न चुकता मशाल क्रांतीचा बोधही दिला होता.

माञ आता याच अविनाश गलांडे यांनी ही धगधगती मशाल पेटविल्यानंतर विधानसभा ठाकरे गटाचे उमेदवार डॉ दिनेश परदेशी यांच्यापासून विजय काही मैल दूर राहीला अन धगधगत्या मशालीच्या चिंगाऱ्या अविनाश पाटलांवर न्यूटनच्या गतीविषयक  तिसऱ्या नियमाप्रमाणे बरसल्या.

यानंतर हालचाली सुरू झाल्या त्या पक्षबदलाच्या डॉ दिनेश परदेशी ,बाळुशेठ संचेती यांच्यासह अन्य बड्या नेत्यांसोबत जात गलांडे पाटलांनी “सबसे कुल-कमल का फुल” चा नारा आजमावत सत्ताधारी पक्षाकडे कुच केली.

ही पक्षप्रवेशाची मोहीम फत्ते होते न होते तोच पुन्हा एकदा शिवसेना ऊबाठा गटाला मोठ खिंडार पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या अन स्थानिक पातळीवर भाजपा खऱ्या अर्थाने सशक्त झाली.

जिल्हा परीषद गट महालगांवचे जर नांव घेतले तर डोळ्यासमोर गलांडे पाटलांच नांव आल्याशिवाय राहत नाही. अविनाश गलांडेंसारखा शेतकरी पुञ असलेल्या या  बिंदास माणसानं  जिल्हा परीषद छञपती संभाजीनगरच्या आरोग्य आणि शिक्षण या खात्याच काम पाहीले यामुळे ते अधिकच चर्चेत राहीले.

आता सध्या महालगांव हा गट शिंदेंची शिवसेना आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नरत आहे. ऐनवेळी कुठलाही चेहरा मैदानात ऊतरविला जाऊ शकतो.त्यामुळे आपण आपल्या तयारीत रहाव म्हणून अविनाश गलांडे हे महालगांव गट सोडून बाहेर पडायला तयार नाहीत.

अगदीच अठरापगड जाती-धर्मातील जनतेला सोबत घेऊन त्यांच्या सुख:दुखा:त हजर राहन्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरूच आहे. गटातील कुठल्याही समाजाच्या व्यक्तीच्या दुखात: अन सुखात सहभागी व्हायचेच हा मानस त्यांनी ऊराशी बाळगलाय.

मग लहानग्यांचे वाढदिवस,जावळ, जागरण गोंधळ,लग्न आणि इतर सोहळ्यांत अविनाश गलांडे हे सातत्याने हजेरी लावत असतात.

आपल्या सत्ता काळात गलांडे यांनी झेपेल तितकी महत्वाची विकासकामे करत अत्यावश्यक असलेल्या गरजा जसे की,रस्ते,छोट्या इमारती ,शालेय गरजा आणि कोरोना काळातील मदत यांसारखे  असंख्य विषय चर्चेचे ठरले.

जिल्हा परीषद अजिंक्य आणि अभेद्य ठेवण्यासाठी गलांडे पाटील तळ ठोकून

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत अविनाश गलांडे यांनी ऊबाठाचे उमेदवार डॉ दिनेश परदेशी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत मशालीच्या माध्यमातून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्यावर आरोपाच्या फैरी सोडल्या होत्या.माञ या आरोपांमुळे आमदार बोरनारे यांच्यावर फारसा परीणाम झाला नाही.

परंतु  एक आक्रमक भुमिका ठेवणारा चेहरा म्हणून गलांडे पाटलांची ओळख निर्माण झाली आहे.या निवडणूकीनंतर भाजपचा प्रवेश अन जनतेच्या समस्या यासाठी गलांडे पाटील काही केल्या गटाच्या बाहेर जाण्यापेक्षा आपला  गटच भला गड्या च्या भुमिकेत नजरेस येत आहेत.

गटातील जनतेच्या मनातील त्यांची प्रतिमा ऊंचविन्याकरीता जनतेच्या समस्या सोडवूच असा कयास बांधून अविनाश गलांडे महालगांव गटातच तळ ठोकून आहे.

“मिले सूर मेरा तुम्हारा” परेदशी-गलांडेंचे विचार एकच !

आता कस तर फक्त भाऊ म्हणतील तस हे स्लोगन केवळ स्लोगन न रहाता अविनाश गलांडेंनी ते अंमलातही आणलय . दादांच्या पुढाकाराने भाऊ मातोश्रीकडे गेले खरे, परंतु यातही मुख्य भुमिका निभावली ते गलांडे पाटलांनीच कारण यावेळी विधानसभा लढवायचीच परंतु शिवसेना ऊबाठाकडून लढवायची असा निरोप डॉ दिनेश परदेशींच्या कानापर्यंत पोहचविला तो गलांडे यांनीच ,आता गलांडे पाटील म्हणताय तर नशिब आजमवायला काय हरकत म्हणून भाऊ तयारही झालेत.

म्हणजे त्यांनी अविनाश गलांडेंच ऐकलच ! असाही अर्थ निघतो. आता नुकत्याच झालेल्या भाजपा पक्ष प्रवेशासाठी डॉ दिनेश परदेशी हे तयारीत असलेल्या चर्चेत सोबतच्या व्यक्तीमत्वांपैकी सर्वात पहीले नांव समोर आले ते म्हणजे अविनाश गलांडेंच….! आता भाऊंना शिवसेनेत चला म्हणाले हे भाऊंनी गलांडें पाटलांचे ऐकल…,

आता भाऊ ,गलांडेंना भाजपमध्ये चला म्हटले हे गलांडेंनी मान्य केल.त्यामुळे राजकीय विचारांच्या बाबतीत गलांडे आणि परदेशी हे मिले सुर मेरा तुम्हारा च्या भुमिकेत पहायला मिळतात.याशिवाय वरच्या फळीला एकमेकाप्रती निष्ठा ठेवणारे हे दोन दिग्गज म्हणजे “दोन धड एक जीव” होय.

कार्यकाळात झालेली कामे


कोरोना काळात रुग्नांना उपचारासाठी ,बहुमोलाची मदत करत मास्क सँनेटाइझर पुरविण्यात योगदान,गाढे पिंपळगांव येथे सहा कोटींच प्राथमिक आरोग्य केंद्र ऊभारल्या जात आहे.ज्याच काम अंतिम टप्प्यात आहे.

या जिल्हा परीषद शाळेंच्या इमारतीचे झाले बांधकाम-

महालगांव,शिरसगांव,पानवी बु|| ,नागमठाण.

या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम-

चांदेगांव बाजाठाण,चेंडुफळ,गाढेपिंपळगांव,जातेगांव,टेंभी,पाणवी बु,भगूर,एकोडीसागज. याशिवाय रस्ते,पिण्याच्या पाण्यासाठी योजना,अंगणवाडी इमारती,डांबरीकरण,खडीकरण,पाणंद रस्ते,यासाठी मोलाची भुमिका,नांदूर-मधमेश्वर कालव्यातून महालगांवच्या पाझर तलावात पाणी आणले,भव्य सचिवालय ऊभारणी कामांसह वैयक्तीक लाभांच्या योजनांमध्ये जनतेला मोलाचे योगदान मिळाले.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.