देवगांव रं-छञपती संभाजीनगर
लाभार्थ्यांची गैरसोय, प्रशासनाचे दुर्लक्ष
कामे पारदर्शकपणे आणि गतिमान होण्यासाठी सर्व प्रकारची शासकीय कामे ऑनलाईन करण्यात आली आहे. मात्र कामे सहजपणे होण्यापेक्षा तांत्रिक अडचणींमुळे ते अधिकच किचकट होत आहेत. याचा फटका मागील काही दिवसांपासून देवगाव रंगारी येथे स्वस्त धान्य दुकानातील मसव्र्व्हर डाउनफ असल्याने सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना धान्य वेळेवर मिळत नसल्याचा बसत असल्याने कार्ड धारकांमध्ये संतापाची लाट आहे.
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानात लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण करण्यात येते. मात्र फेब्रुवारी महिन्यातच ई-पॉझ मशिनच्या सव्र्व्हर डाऊनमुळे देवगाव रंगारी येथील शेकडो लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित राहिले असून उर्वरित धान्य येथील कार्डधारकांना वेळेवर मिळावे,

यासाठी सबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी कार्डधारकांकडून करण्यात येत आहे. देवगाव रंगारी येथे रेशन कार्डधारकांना येथील स्वस्त धान्य दुकान या चार दुकानांच्या माध्यमातून येथे दर महिन्याला मोफत धान्य वितरण केले जाते. मात्र फेब्रुव- ारीपर्यंत येथील दुकानात जवळपास ४० टक्के कार्डधारकांना स्वस्त धान्य वितरण करण्यात आले आहे. मशिनचा सव्र्व्हर डाऊन असल्यामुळे अद्यापही येथील ६० टक्के कार्डधारक धान्यपासून वंचित राहिले आहेत. वंचित असलेल्या कार्डधारकांना धान्य मिळेल, याची शाश्वती कमी
शिधापत्रिकाधारकांची तारांबळ
दररोज सकाळच्या सुमारास देवगाव रंगारी येथील रेशन कार्डधारक स्वस्त धान्य दुकानात दिसून आला. सकाळी नागरिक धान्य घेण्यासाठी गेले तर काही ई- केवायसी करण्यासाठी गेले असता ई-पॉझ मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे तासनतास बसून वाट पाहत असल्याचे चित्र दिसले.ई केवायसीचे सर्व्हर सुरळीत करावे, तसेच तांत्रिक अडचणी दूर करून शिधापत्रिका ई-केवायसीकरिता मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
असल्याने फेब्रुवारी महिन्याचा धान्यसाठा पुरवठा विभागाने मुदतवाढ देण्यात यावी आणि चालू महिन्यांचे मार्च अशा दोन महिन्यांचे धान्य एकत्र द्यावे, अशी मागणी होत आहे.