कन्नड/छञपती संभाजीनगर/सोमनाथ पवार
एक मार्च रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय कन्नड येथे मूळ खामगाव या खेड्यातून आलेल्या आणि आता कन्नड पंचायत समितीत क्लार्क म्हणून काम करत असलेल्या श्री ज्ञानेश्वर गायके यांच्या” पेरणी”या कवितासंग्रहाला राज्य शासनाने अनुदान दिले.

त्याचे प्रकाशन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रसिद्ध डॉक्टर वासुदेव जी मुलाटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ एडवोकेट कृष्णाजी जाधव डॉक्टर यशवंत पवार, डॉ. शिवाजी हुसे सर. ग्रंथालयाधिक्षक पवार साहेब हरिभक्त परायण अकोलकर महाराज, आत्ताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त डॉ. रमेश सूर्यवंशी सर, ज्येष्ठ वक्ते प्राध्यापक लहाने सर. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ. संजय गायकवाड सर भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जी काळे व भाजपा तालुका अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष भगवानराव लहाने यांची उपस्थिती होती