जिल्हा दूध महासंघाच्या निर्णय : शेतकरी, सभासदांना दिलासा
District Milk Federation’s decision: Relief for farmers, members
जिल्हा दूध महासंघाने शेतकऱ्यांना दिलासा
देणारा निर्णय घेतला आहे. महासंघाकडून नुकतेच दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांकडून आता दूध प्रतिलिटर ३२ रुपये प्रमाणे खरेदी केले जात आहे. आधी ३० रुपये प्रतिलिटर प्रमाणे खरेदी दर होते. खरेदी दर वाढवले तर दुधाचे विक्री दर प्रतिलिटर ५२ रुपयेच असल्याचे महासंघाकडून नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रावर दररोज सुमारे ६५ हजार लिटर दूध संकलन
About 65 thousand liters of milk are collected daily at the collection center of the District Milk Association.
होते. जिल्ह्यासह विविध तालुक्यातील सुमारे वीस हजार दूध उत्पादक, शेतकरी या संकलन केंद्रावर दूध आणून देतात. त्यांच्याकडून ३० रुपये लिटर दराने दूध खरेदी केले जात होती. यात आता २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महासंघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ३.५ तसेच ८.५ या दूध गुणप्रतीकरीता प्रतिलिटर ३० ऐवजी आता ३२ रुपये खरेदी दर करण्यात आला आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ३५० प्राथमिक सहकारी दूध संस्थामार्फत सुमारे २० हजार दुध उत्पादक शेतकऱ्यांना
लिटर मागे २० रुपयांची तफावत
शेतकऱ्यांकडून खरेदीदर दोन रुपयांनी वाढवले तरी विक्री दर मात्र ५२ रुपये लिटर प्रमाणेच ठेवल्याने ग्राहकांना दिलासा आहे. परंतु त्यातही तब्बल २० रुपयांची तफावत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच ३२ रुपये दराने शेतकऱ्यांकडून घेतलेला दूध ग्राहकांस ५२ रुपये म्हणजे वीस रुपये अधिकने विक्री होत आहे.
होत असल्याने महासंघास दूध पुरवठा करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.