पाणी टँकर सुरू करण्यासाठी अजय साळूंखेंचे आजपासून आमरण ऊपोषण
सध्या ऊन्हाच्या झळा वाढत असून ,विहीर बोअरवेल ने तळ गाठला आहे. यातच शेततळे तलाव अनेक ठीकाणी कोरडे पडले आहेत.अशा स्थितीत पिण्यासाठी पाण्याची तहान भागवणे जिकरीचे बनले आहे.वैजापूर तालुक्यातील टूनकी-दसकुली सह वैजापूर तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऊभा ठाकला आहे.

गावा- गावात तात्काळ पाणी टँकर चालू करण्याच्या मागणीला अनुसरून ता 04 मार्च पासून , अजय साळुंके हे वैजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १ महिन्यापासून टुणकी दसकुली व वैजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाले आहे. तसे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय वैजापूर येथे दाखल करण्यात आले आहे. पण प्रस्ताव तसेच पडून आहे अनेकदा वेळो वेळी तोंडी सूचना दिल्या तसेच लेखी निवेदन दिले परंतु प्रश्न मार्गी लागत नसल्यान हे आमरण ऊपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
जनावरांना 35 ते 40 लिटर पाणी शासनाच्या आदेशाप्रमाणे दिलेच पाहिजे पण ते पाणी २० ते २५ लिटर देऊ असे अधिकारी सांगत आहे त्यामुळे जनावरांचा पाण्याची भूक् भागत नाही त्यामुळे किमान जनावरांसाठी 60 ते 65 लिटर पाणी दिले पाहिजे अशी मागणी साळुंके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील प्रश्न मार्गी लागत नसल्यान त्यांनी तहसील कार्यालय वैजापूर येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.