संतोष गंगवार/देवगांव रं: छञपती संभाजीनगर

देवगांव रंगारी येथील संत बहिणाबाई इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आलेले प्रयोगांची माहिती घेतांना संस्थेचे सरचिटणीस प्रसन्ना पाटील, केंद्रप्रमुख गायकवाड , शेखर खैरे आदी
देवगाव रंगारी येथील संत बहिणाबाई इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शन. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त येथील संत बहिणाबाई इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षस्थानी विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्रसन्ना पाटील होते व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख बी .जे. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका .मीरा गुंजाळ ,संत बहिणाबाई इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका . वैशाली देशमुख , ज्योत्स्ना वानखेडे, छाया बुवा, ज्योती पवार यांची उपस्थित होती.
यावेळी विज्ञान प्रदर्शनात (Science exhibition) साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध संकल्पना आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून उलगडून दाखवल्याने सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा काळाची गरज, स्मार्ट सिटी, हवा व हवेचे गुणधर्म, कंपोस्ट खत, कचरा व्यवस्थापन, शरीराचे अवयव, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पवनचक्की इत्यादी प्रयोग सादर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर खैरे, कपिल भायभग, कल्पना दिवेकर, सुनंदा सोनवणे, रत्नमाला जगताप माधुरी भायभग, अंजली वाणी, सोनाली वाघुळे, पायल वाघ, कावेरी पवार, संध्या पोपळघट, यांनी पुढाकार घेतला. व सूत्रसंचालन पल्लवी करपे यांनी केले