पुणे: कलाविश्व
जागतिक स्तरावरील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द गायक पद्मश्री प्राप्त हरीहरण (Hariharan Song) यांच्या संकल्पनेतून पुण्यात तीन दिवसाचा महत्वपूर्ण कार्यक्रम साकार झाला. Soul India महोत्सव हा कार्यक्रम प्रचंड गाजला.

या महोत्सवात दुसर्या दिवशी सुप्रसिध्द दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी दिग्दर्शित केलेल्या Sounds Of Maharashtra साऊंडस ऑफ महाराष्ट्रा या कार्यक्रमात सुप्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे आणि घाशीराम कोतवाल या नाटक कलाकारांच्या टिम बरोबर सुप्रसिद्ध गायक प्रा योगेश चिकटगांवकर यांच्यासह ४५ कलाकारांसमवेत जवळपास १५ ते २० लोककला अगदी दणक्यात सादर करण्यात आल्या.
हा संपूर्ण कार्यक्रम श्री हरीहरण यांनी कलामंचासमोर बसुन बघितला .या कलाकारांच्या पाठीवर हरीहरण यांच्यासह मान्यवरांना आर्शिवादाची थाप दिली. मनमोकळेपणाने कौतुकाचा भरभरुन वर्षाव देखील केला.
कार्यक्रमाचे संकल्पक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचे चिकटगांवकर यांनी आभार मानले.