लासूर स्टेशन येथील रेल्वेगेट नंबर ३४ होणार भुयारी मार्ग
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : नेहमी वाहनधारकांची डोकेदुखी ठरत नसलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील रेल्वेगेट ३४ वरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लासूर स्टेशन येथील रेल्वे मार्गाखालून भुयारीच मार्ग करण्यात यावा, असा ठराव ग्रामसभेत एकमताने पारित करण्यात आला.

गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी उड्डाणपूल की भुयारी मार्ग करायचा यावर मत तर्क वितर्क लावले जात होते. अनेक महिन्यांपासून रखडलेला हा प्रश्न अखेर शनिवारी (दि.१) झालेल्या विशेष ग्रामसभेत निकाली निघाला आहे.
आमदार प्रशांत बंब यांच्या सूचनेवरून लासूर सावंगी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीना संजय पांडव उपस्थित होत्या. प्रास्तविकात आ. बंब यांनी ग्रामसभेच्या आयोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना त्यांचे प्रश्न व सूचना उपस्थित करण्याची संधी दिली. कायगाव देवगाव राज्य मार्ग ३९ वर असलेल्या रेल्वेगेट ३४ वर उड्डाणपूल
भुयारी मार्गाला ग्रामस्थांची पसंती
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेला हा प्रश्न ग्रामसभेत निकाली निघाला आहे. उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्गाला ग्रामस्थांनी पसंती दिली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. भुयारी मार्गाचे काम सुरू व्हायला प्रत्यक्षात तीन महिने लागणार असून पूर्ण होण्यास एक वर्ष लागणार आहे, अशी माहिती आ. बंब यांनी नागरिकांना दिली.
(ओव्हर ब्रिज) over bridge न करता भुयारी मार्ग करणेच योग्य ठरेल, असे ग्रामस्थांचे मत ठरले. या ठिकाणी भुयारी मार्ग करावा, असा ठराव संतोष पांडुरंग जाधव यांनी मांडला. त्याला अशोक शिरसाट यांनी अनुमोदन दिले. ठरावाच्या बाजूने उपस्थित ग्रामस्थांनी हात वर करून मतदान केले. ठरावाच्या विरोधात एकाही ग्रामस्थाने हात वर केले नाही