Ladki Bahin Yojna Update: लाडक्या बहिणींचा भाऊ Action Mode मध्ये हजारो बहिणी केल्या अपाञ
13 लाख लाडक्या बहिणी अपात्र ?
राज्यात अपात्र लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात अपात्र महिलांची संख्या 12 ते 13 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच या योजनेमुळे सरकारवर कोणताही आर्थिक ताण येत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.
यंदा 2100 रुपयांचा लाभ मिळणार नाही :

यंदाच्या अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रूपयांचा लाभ मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पापासून 2100 रुपयांचा लाभ मिळणार नसल्याचे, महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावरील उत्तरावेळी त्यांनी याबाबत सांगितले.
यवतमाळमध्ये 7 लाख 19 महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 27 हजार 317 अर्ज छाननीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीत बाद झाले आहेत. तर अमरावती जिल्ह्यातही 22 हजार 68 अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात केवळ 6 लाख 98 हजार महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं कुठेही वक्तव्य केलेलं नाही की, याच अधिवेशनात आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. निवडणुकीचा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अधिवेशनापुरता नसतो. जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रस्ताव ठेवतील त्यानंतर आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून तसा प्रस्ताव सादर करु अशी माहिती तटकरे यांनी दिली.













