ताज्या बातम्या बिंदास राजकारण

जागावाटपावरून माविआतील वाद चव्हाट्यावर.. विदर्भातील जागांवरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस वाद.. नाना पटोले संजय राऊत आमने सामने…

“गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारणानं अनेक वेगवेगळ्या घटना पाहिल्या, त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेनं भाजपसोबत असलेली आपली युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं…या महाविकास आघाडीनं २०१९ मध्ये आपली सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.”

पण आता जागावाटपाची वेळ आली आणि यांच्यातील वाद समोर येऊ लागला. विदर्भातील जागावाटपावरुन चर्चेदरम्यान महाविकास आघाडीतील मतभिन्नता उघड झाली.

फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले मविआचे लोक आता एकमेकांवर कुरघोड्या करायला लागले आहेत.काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते सक्षम नाहीत असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर टीका केली. नाना पटोले जर जागा वाटपाच्या बैठकीत असतील तर आम्ही बैठकीत येणार नाही असं ठाकरे गटाचे नेते म्हणाले.

नाना पटोलेंनीही “संजय राऊत उद्धव ठाकरेंना जुमानत नसावेत, संजय राऊत काय म्हणतात याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही” म्हणत ठाकरे गटाची उणीदुणी काढली. आता जागावाटप सुरूही झाले नाही, तर मविआचे नेते विदर्भातल्या जागावाटपावरून हमरीतुमरी वर आले आहेत. या वादावर पडदा टाकण्यासाठी आता पावरांपासून माविआचे इतर नेते प्रयत्न करू लागलेत.

पण चुकून माकून हे लोक सत्तेत आले तर सत्तेची मलई खाण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जातील.. हे यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.