यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे शिंदे सरकारने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण योजना’… ही योजना महिला मतदारांवर थेट प्रभाव टाकणारी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्य्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा सूर विरोधकांनी आवळला होता. ही योजना सुरु झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला होता. तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ देखील राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. म्हणजे एकूण ७५०० रु महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये,अ स अदिती तटकरे यांनी म्हटलंय.
मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर काल ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले.
पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे. आचारसंहितेत मतदारांवर थेट पराभव टाकणाऱ्या योजना तात्पुरत्या स्थगित केल्या जातात, मात्र महायुती सरकारने पुढील २ महिन्यांचे पैसे अडव्हांस मधे अगोदरच महिलांच्या खात्यात जमा केले आहे. आचारसंहितेच्या नावाखाली निवडणूक आयोग योजना तात्पुरती थांबवा अस म्हणेल याचा अंदाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आधीच होता त्यामुळे यांची दक्षत घेऊनच पुढील महिन्याचे पैसे आधीच महिलांच्या खात्यात वर्ग केले गेले आहेत. लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाकडून थांबवली गेल्याची फेक न्यूज मविआ कडून पसरवली जात आहे. पण वास्तवात, निवडणूक आयोग कोणत्याही सरकारी योजना बंद पाडू शकत नाही. फक्त आचारसंहिता सुरु झाली अनेक ज्या योजना असतात त्या महिनाभरासाठी तात्पुरत्या थागीर केल्या जातात. फक्त निवडणुकीच्या वेळेपुरते सरकारी योजना महिन्याभरापुरत्या थांबवल्या जातात. म्हणूनच सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आधीच जमा केलेत. निवडणूक संपली की योजना पुन्हा चालू होतात. योजना सुरु झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे ७,५०० रुपये महिलांना आधीच मिळाले आहेत. डिसेम्बर महिन्याचे पैसे मिळतील अस अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. आणि पुढे देखील योजना सुरूच राहणार आहे. महिलांना मिळणाऱ्या पैशात कोणताही खंड पडणार नाही. नोव्हेंबर मध्ये निवडणुका संपल्यावर, महायुती सरकार परत सत्तेत आले की डिसेम्बर मध्ये डिसेम्बर महिन्याचे पैसेही मिळतील. आणि योजना अशीच सुरु राहील. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल तर योजनेच काय होईल हे सांगता येत नाही. पण कोणतच सरकार अशी क्रांतिकारी योजना बंद करण्याच धाडस करेल अस वाटत नाही. त्यामुळे लाडकी बहिण योजना बंद झाली हि बातमी खोटी आहे. निराधार आहे.असे मत महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलंय ..