देवगांव रंगारीत ३७५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री निळकंठेश्वर महादेव मंदिराचा
जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठाण व कलशारोहण सोहळा
संत बहिणाबाई महाराज यांचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र देवगांव रंगारी येथे संत बहिणाबाई यांचे वडील आऊजी कुलकर्णी व आई जानकीबाई कुलकर्णी यांनी अनुष्ठान केलेल्या सुमारे साडेतीन वर्षे जुन्या निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कलशारोहण प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (ता २४)सुरु होत आहे.

यानिमित्त पुजा रुद्रा यागत्मक त्रिदिनात्माक पुजा प्रारंभ सोमवारी (ता.२४) रोजी सकाळी सात वाजता प्रतिष्ठा कर्मास आरंभ ७ वाजता प्रायश्चित्त संकल्प सकाळी आठ ते बारा मंदिर मंडप प्रवेश शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणेश पूजन,मंडप पुण्याहवाचन,वसोर्द्धारा मातृका पुजन , नांदी श्राद्ध,ऋत्वीक वरणमब,दिग्रक्षण, पंचगव्य,कुंड पुजन, बारा ते दोन अल्पोपहार विश्राम, दोन ते पाच मृर्ती जलाधिवास,मृर्ती न्यास शय्यादि तथा धान्यादि वास तर दुसऱ्या दिवशी (ता.२५) मंगळवारी सकाळी सात ते बारा शांतीपाठ प्रातः पुजन,

अग्निस्थापन,योगिन्यादी ईशानान्त मंडल,देव स्थापना पुजन,बारा ते दोन अल्पोपहार, विश्राम, दोन ते पाच स्नपन ग्रहमख रुद्रा हवन, सायंकाळी पुजन आरती तिसऱ्या दिवशी (ता २६) बुधवारी सकाळी सात ते दहा प्रसाद पुजन,पिंडीका स्थापना पुजन, दहा ते बारा प्राणप्रतिष्ठा उपनयन, विवाह संस्कार महापुजन, बलिदान, पूर्णाहुती, महाआरती,संपाध्य श्रेयोदान आशिर्वाद देवता विसर्जन चौथ्या दिवशी (ता.२७) गुरुवारी नैवेद्य अभिषेक, महाआरती, महाप्रसाद तसेच आकरा ते बारा वाजता प्रवचन ह.भ.प.आप्पा महाराज शास्त्री यांचे प्रवचन होईल आणि नंतर महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
