स्वार्थापलिकडे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारा,ध्येयवेडा योद्धा-डॉ जिवन राजपूत
मिशन ‘जेआर’ च्या माध्यमातून जनसेवा,राष्ट्रसेवा
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेडे गावात वास्तव्य करून प्राथमिक शिक्षणही खेडे गावात घेतले. बेकार न होता संस्कारी बनले आणि याच संस्काराच्या जोरावर पुढे उच्चशिक्षीत होऊन जनसेवा,राष्ट्रसेवेसाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या एका नामांकीत डॉक्टर,ऊद्योजक,आणि वकीलाबद्दल आपल्याला काही माहीत नसलेल्या गोष्टी आपण बिंदासच्या माध्यमातून जाणून घेऊ.

बालवयापासूनच जनसेवेचा छंद
बालवयात आपले,मिञ सवंगडी यांच्यासोबत वावरताना,खेळताना त्यांच्या छोट्या-छोट्या अडचणींना समजून त्यावर तोडगा काढला. मिञांना असलेल्या छोट्या-छोट्या अडचणींमध्ये मदत केली. अगदीच आपल्या जवळील पुस्तके,वह्या ,पेन मिञांना द्यायचे जेव्हा जेआर शाळेत होते तेव्हा पेन ,पुस्तक पेन्सिल हे विषय खुप जिव्हाळ्याचे आणि मौलिक होते.त्यामुळे त्यांचे सवंगडी हे शेतकरी ,कष्टकरी ,मजूरांच्या परीवारातील होते.

आपल्या मिञांच्या अडचणीच्या भावनांना परीस्थितीला समजून घेत जेआर त्यांच्या मदतीला धाऊन जायचे. यांमुळे या बालवयातही ‘जेआर’ पॉप्युलर होते.पुढे महाविद्यालयीन जिवनातही ‘जेआर’ युवावर्गात लोकप्रिय झाले.जिद्द चिकाटी आणि मेहनतीने ‘जेआर’ यांनी वैद्यकीय क्षेञात न्युरोसर्जन म्हणून नावलौकीक केले.मराठवाड्यातील सर्वात मोठ-मोठ्या मेंदु शी संबंधित शस्ञक्रीया त्यांच्या जेजेप्लस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडतात.शिक्षणाच्या बाबतीत ‘जेआर’ थांबलेच नाही त्यांनी कायदेक्षेञात वकीलीची पदवी मिळवली आणि ऊद्योगविश्वातही मोठे नांव केल्याने डॉ जिवन राजपूत ऊर्फ ‘जेआर’ हे महाराष्ट्रात विख्यात झाले आहे.

सामाजिक ध्यास,प्रत्येकाचा विकास
समाजात अनेक विवीध प्रकारचे प्रश्नांवर ‘जेआर’ यांनी अभ्यास केला.बालवयात आजू-बाजूला निर्माण झालेली परिस्थिती समस्यांमुळे जेआर यांच्यात सतत सामाजिक परीवर्तनाचे चलचिञ दिसून यायचे. यांमुळेच त्यांनी वि सपोर्ट जे आर ही मोहीम राबवली या मोहीमेमागील त्यांचा ऊद्देश गोपणिय होता. कारण ‘ जेआर’ यांच्या मते आपल्याला जे करायच आहे त्याचा गाजा-वाजा न करता कार्य करायला हवे. कारण चांगले कर्म हे गाजा-वाजा न करता झाले तर ते कार्य सार्थकी लागते. या मोहीमेत त्यांना जिल्ह्यातील हजारो युवकांनी सपोर्ट करत कार्याचे कौतुक केले. युवकांसाठी शैक्षणिक मदतीत ,वसतिगृहांच्या संबंधित मदतीत जेआर अग्रेसर राहीले आहेत.सध्या जे आर म्हणजेच जनसेवा ,राष्ट्रसेवा या मोहीमेंतर्गत गाव,वाडे,वस्ती ,तांड्यांवर जेआर स्वत: भेट देऊन आरोग्य शिबीर घेतात.यांमुळे जनआरोग्य सुधारण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे.

परीवाराचा राखीव वेळ समाजाला
डॉ जिवन राजपूत हे दैनंदिन जिवनात कामकाजामुळे व्यस्त असतात.परंतु तरिही सामाजिक समारंभ आणि समाजाच्या समस्यांच्या बाबतित जेआर जमेल त्या पद्धतीने कार्य करत असतात.
सध्या ग्रामीण भागात त्यांच्या या मोहीमेत शेकडो समाजसेवक कार्य करतात आपल्या सामाजिक कार्याची ओळख जे आर यांनी केवळ राज्यभरच नाही तर देशाच्या विवीध काना-कोपऱ्यात पोहचवली आहे.मग ते राज्यातील समाजसेवक अण्णा हजारे असतील किंवा विवीध पक्षाचे उच्च पदस्थित नेते असतील ‘जेआर’ सर्वांच्याच परिचयाचे आहेत.देशासह राज्यात ‘जेआर’ यांची ओळख आणि परीचय कसा आहे यापेक्षा ‘ जेआर’ यांच्या रुपाण मराठवाड्याच्या खाणीत हीरा मिळालाय हे माञ निश्चीत