छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित नव्याने ऊभा राहीलेला पंचगंगा ऊद्योग समूहाचा पंचगंगा साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी नवनविन पाऊल ऊचलत आहे. यावेळी नेमकी कुठली महत्वाची भुमिका त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलीय पाहुयात बिंदासच्या Bindass Agro या रीपोर्टमध्ये..

वैजापूर गंगापूर व रत्नपुर तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापक टिमने आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांच्या मागील वीस वर्षापासून अडचणी लक्षात घेऊन तसेच वैजापूर व गंगापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे आग्रहा खातर ऊस उत्पादकांची असलेली मागणी विचारात घेतली आहे.

आपल्या तालुक्यामध्ये मागील दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर पंचगंगा शुगर अँड पॉवर साखर कारखान्याची उभारणी केलेली आहे , बरेचसे शेतकरी बांधव भूमिपूजन तसेच कारखान्याचे मोळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते, तीनही तालुक्याच्या उसाची उपलब्धता लक्षात घेऊन कारखान्याची क्षमता 6500 टन प्रतिदिन एवढी ठेवण्यात आल्याच परीपञक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.

कारखान्यांमध्ये इतर उपपदार्थांची निर्मीती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे ते पञकात म्हणतात की,आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आजवर म्हणजेच 30 जानेवारी रोजी एक लाख पंचविस हजार टन ऊस गळीताचा टप्पा पार केला आहे.
तसेच गाळप केलेल्या उसास प्रति टन 2850 असा अॅडव्हान्स उचल दर जाहीर केलेला आहे.
असे असले तरी हा दर अंतिम नाही, तसेच तोडणी व नियोजन करणे साठी हार्वेस्टर, ट्रक ट्रॅक्टर टोळी व जुगाड ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कारखाना प्रशासनाच्या विनंतीवरून ऊस तोडणी कामगार यांनी आज पर्यंत गाळपास आलेल्या कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस जाळून तोडला नाही त्यामुळे ऊस वजनात होणारी घट थांबली आहे .
तसेच कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी सवलत देण्यात आले आहे की,
शेतकऱ्यांनी कुठल्याही वजन काट्यावर वजन करून आपले उसाच्या वजनाची खात्री करू शकता त्यास कारखाना प्रशासनाची हरकत राहणार नाही.

अशा परिस्थितीमध्ये आपल्या हक्काच्या ऊस तीनही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी ,आपला ऊस शेतकऱ्यांनी पंचगंगा कारखान्यास देऊन सहकार्य करावे व नवीन लागवड केलेल्या उसाची तसेच खोडवा पिकाची नोंद कारखान्यास द्यावी असे आव्हाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कारखाना प्रशासनाकडून हमीपत्र देण्यात येत आहे त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशी सुचना शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.