ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र

“श्री संताजी आर्थिक विकास महामंडळ स्थापण  निर्णयांची अंमलबजावणी कार्यान्वित करण्यासाठी निवेदन

“श्री संताजी आर्थिक विकास महामंडळ” राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सरकारी निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून हे महामंडळ स्थापन करून प्रत्यक्षपणे कार्यान्वित करणे बाबत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेब यांना तहसिलदार  छ.संभाजीनगर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

नुकतेच काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील समस्त तेली समाजाच्या विकासासाठी तेली समाज मतदाराला दिलेले आश्वासन श्री संतांजी आर्थिक विकास महामंडळाची “औपचारिक स्थापनेची घोषणा करून शासन निर्णय पारित करण्यात आला परंतु निवडणूक होवून मंत्रिमंडळ स्थापन होवून किमान तीन महीने झालेत परंतु अद्यापपर्यंत या महामंडळाची स्थापना प्रत्यक्षपणे अजूनही कार्यान्वित होवू शकली नाही ,याची खंत व खेद महाराष्ट्र राज्यातील समस्त तेली समाज अजुनही चातक पक्षासारखी वाट बघत आहे.


संपुर्ण महाराष्ट्रीतील तेली समाज या निर्णयाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट बघत असल्याचे संतोष गायकवाड (पालखेडकर) जिल्हाध्यक्ष छ.संभाजीनगर यांच्या नेतृत्वात श्री संताजी अखिल तेली समाज संघटन छ.संभाजीनगर निवेदन सादर केले.

तेली समाजाला दिलेले आश्वासन संघटनेचे सकारात्मक निवेदन स्विकारून पुर्ण कराल.अशी समस्त संघटनेकडुन अपेक्षा करीत असल्याचे गायकवाड.

संघटनेचे निवेदन देतांना संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब क्षीरसागर महासचिव छ.संभाजीनगर,काकासाहेब धारकर,गणेश वाडेकर,बबन धारकर तथा समाजबांधव उपस्थित होते.

तहसिलदार साहेब यांनी निवेदन स्विकारून आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना आपल्या मागण्या निवेदनाच्या मार्फत पुढे पाठविण्याचे आश्वासन दिले.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.