ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र

“पानवी बु” ग्रामस्थांना आमदार प्रा बोरनारे यांच 14 कोटी 69 लाखांच गिफ्ट

मौजे “पानवी बु” येथे भव्य नागरि सत्कार सोहळा व “14 कोटी 69 लाख रुपये निधी” मंजूर कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

वैजापूर मतदारसंघात  आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे हे दुसर्‍यांदा विधानसभेचे सदस्य म्हणुन निवडुन आल्याने त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल व शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरिक सत्कार सोहळा आयोजित केला.

या सत्कार सोहळ्यास कार्यसम्राट आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे यांनी उपस्थित राहून सत्काराचा आदर:पूर्वक स्विकार केला. आमदार_साहेब यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल आमदार साहेबांनी देखील उपस्थित नागरिकांचे ऋण व्यक्त करत आभार मानले.

वैजापुर-गंगापुर मतदारसंघातील “पानवी बु” येथे कार्यसम्राट आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांनी विविध रस्ते डांबरीकरणासाठी “14 कोटी 69 लाख रुपये निधी” मंजूर करून आणलेल्या कामांचे भूमिपूजन आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भूमरे यांच्या हस्ते व कार्यसम्राट आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर आणि माजी आमदार भाऊसाहेब पा चिकटगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

जातेगाव-पानवी बु.-वक्ती ते 14 मैल रस्ता डांबरीकरण “5 कोटी 50 लाख रुपये कामांचे भूमिपूजन
बाजाठाण फाटा ते पानवी बु.- माळी घोगरगाव-गाढे पिंपळगाव-चेंडूफळ रस्ता सिमेंट डांबरीकरण “9 कोटी 19 लाख रुपये कामांचे भूमिपूजन



आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे आणि माजी आमदार भाऊसाहेब पा चिकटगावकर, सभापती रामहरी बापू जाधव, मा सभापती संजय पा निकम, उपजिल्हाप्रमुख दिलिपसिंग राजपूत, राजेंद्र पा शिसोदे, संचालक ज्ञानेश्वर पा जगताप, सुभाष पा मुळे, उपकार्यकारी अभियंता लिंभारे साहेब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी गणेश दादा चव्हाण, भाऊसाहेब भाऊ वाघचौरे, प्रशांत पा शिंदे, पिंटू काका, शुभम गुंजाळ, शेळके साहेब, प्रमोद कुलकर्णी, बाळासाहेब चेळेकर, भरत पा गुंड यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.