वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील कै. दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शेख एम. एन. यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्राचार्य शेख यांनी आपल्या कार्यकाळात शाळेच्या शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी, शाळेची स्वच्छता, परिसराचे डेकोरेशन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मुलांसाठी खेळाचे गार्डन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठा हॉल यांसारख्या सुविधांचा विकास केला आहे.

त्यांच्या या प्रयत्नांमुळे शाळेचा स्तर उंचावला आहे. ९ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक व सहकाऱ्यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.